मुंबई : आयसीआयसीआय, एसबीआय अशा सहा प्रमुख बॅंकांच्या डेबिट कार्डचा वापर करून रेल्वेची ऑनलाईन तिकीटं बुक होणार नसल्याच्या बातम्या काल पसरत होत्या.
झपाट्याने पसरत असलेले हे रिपोर्ट्स चुकीचे असून कोणत्याही बॅंकांचे कार्ड ब्लॉक केलेले नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
एका खास ट्विटमधून रेल्वेने ही माहिती दिली आहे. कोणतेही डेबिट कार्ड किंवा क्रेडीट कार्ड ब्लॉक केलेले नसून काही मीडिया रिपोर्ट्स चूकीची माहिती देत असल्याचा खुलासा रेल्वे कडून करण्यात आला आहे.
भारतीय बॅंक असोसिएशन आणि आयआरसीटीसीमध्ये ऑनलाईन पेमेंटमधील सेवा शुल्क घेण्यावरून वाद झाला परिणामी काही बॅंकांचे कार्ड आयआरसीटीसीने बंद केल्याची माहिती पसरत होती. परिणामी प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढणं अशक्य होत असल्याची बातमी पसरत असल्याने प्रवाशांमध्येही गोंधळ निर्माण झाला होता.
मात्र आता खुद्द रेल्वे प्रशासनाने या वादाबाबत खुलासा केल्याने प्रवाशांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे.