वीज संकटाची चर्चा निराधार; केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी दिले हे स्पष्टीकरण

देशात मोठ्या वीज संकटाच्या चर्चांवर केंद्रीय ऊर्जा मंत्री आरके सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Oct 10, 2021, 03:58 PM IST
 वीज संकटाची चर्चा निराधार; केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी दिले हे स्पष्टीकरण title=

नवी दिल्ली : देशात मोठ्या वीज संकटाच्या चर्चांवर केंद्रीय ऊर्जा मंत्री आरके सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, देशात कोळशाची कमतरता नाही. या चर्चांना विनाकारण वाढवण्यात येत आहे.

दिल्लीत वीज कपात नाही - मंत्री
ऊर्जा मंत्री आरके सिंह यांनी म्हटले की,  शनिवारी सायंकाळी दिल्लीचे उपराज्यपाल यांच्याशी चर्चा झाली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. मी त्यांना म्हटले की, वीजेची उपलब्धता व्यवस्थित आहे. आणि व्यवस्थितच राहणार आहे.

अशी पसरली वीजेच्या संकटाची बातमी
आरके सिंह यांनी म्हटले की, GAIL कडून गेलेल्या एका मॅसेजचा विपर्यास झाला. वीज निमिर्तीसाठी स्टॉक सप्लाय सुरू राहिल. गरज पडली तर इंपोर्टेड गॅससुद्धा देशभरात उपलब्ध करण्यात येईल. तसेच TATA च्या सीईओंना सुद्धा इशारा देण्यात आला की यापुढे असे निराधार गोष्टींना थारा देऊ नये. जेवढा स्टॉक वापरला जात आहे. त्यापेक्षा जास्त येत आहे. प्रल्हाद जोशी यांच्याशीही चर्चा सुरू आहे.

ऊर्जामंत्र्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चिठ्ठी लिहिली आहे. परंतु अशी कोणतीही अडचण नाही. जेथे जेवढ्या कोळशाची गरज आहे तेथे तेवढा कोळसा पुरवला जात आहे. कोळशाची मागणी निश्चितच वाढली आहे. कारण आपली अर्थव्यवस्था वाढतेय. या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे.