शेतकऱ्यांना आयुष्यभर मिळणार 3000 रुपये पेंशन; फक्त करावे लागणार हे काम

पंतप्रधान किसान मानधन योजनेअंतर्गत देशातील लहान-सिमांत शेतकऱ्यांना म्हातारपणात मदत म्हणून महिन्याला 3000 हजार रुपयांची रक्कम मिळू शकते

Updated: Oct 10, 2021, 02:46 PM IST
शेतकऱ्यांना आयुष्यभर मिळणार 3000 रुपये पेंशन; फक्त करावे लागणार हे काम title=

नवी दिल्ली : तुम्हाला माहितीये का की पंतप्रधान किसान सन्मान निधीतून मिळणाऱ्या 6 हजार रुपयांच्या सोबतच वर्षिक 36 हजार रुपयांच्या सरकारी योजनेचादेखील लाभ घेऊ शकता. जर तुम्ही सन्मान निधी प्राप्त करीत आहात तर, तुम्हाला वेगळ्या कागदपत्रांची गरज नाही. या योजनेचे नाव किसान मानधन योजना (pm kisan mandhan yojana) ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान किसान मानधन योजनेअंतर्गत देशातील लहान-सिमांत शेतकऱ्यांना म्हातारपणात मदत म्हणून महिन्याला 3000 हजार रुपयांची रक्कम मिळू शकते. ही रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या म्हातारपणातील जीवनात कामी येईल.

वयोगट
पीएम किसान मानधन योजनेला पीएम किसान पेंशन योजना म्हणून देखील ओळखले जाते. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान हवे.  यासाठी लाभार्थ्यांचे स्वतःचे बँकेचे अकाउंट हवे. बँक अकाउंट आधार क्रमांकाला लिंक हवे. वयाच्या 60 व्या वर्षानंतर लाभार्थ्याला या पेंशनचा लाभ घेता येईल.

नॉमिनी
लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला पेंशन म्हणून 1500 रुपये महिन्याला दिले जातील.

अर्ज कसा करणार
त्यासाठी   maandhan.in या वेबसाईट वर भेट द्यावी. त्यानंतर लाग इन पेज ओपन होईल. लॉग इन केल्यानंतर अर्जात तुमचा मोबाईंल नंबर नमूद करा. मोबाईल नंबरवर नोंदणी केल्यानंतर उर्वरित माहिती भरा. त्यानंतर जनरेट ओटीपी वर क्लिक करा. आणि ओटीपी नंबर नमूद करा.

ओटीपी नमूद केल्यानंतर एक अर्ज समोर येईल. या फॉर्ममध्ये वयक्तिक माहिती आणि बँक डिटेल आदी सर्व माहिती भरा. सबमिट केल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआऊट काढा तसेच पुढील वापरासाठी जतन करून ठेवा

pm kisan mandhan yojana small farmers will get a pension for life will have to pay just this premium