Milk Price Hike News in Marathi : गेल्या वर्षभरात देशात दुधाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अमूलपासून मदर डेअरीपर्यंत सर्वच कंपन्यांनी दर वाढवले आहेत. भारतात गेल्या तीन वर्षांत दुधाच्या दरात 22 टक्क्यांनी वाढ झाली असून, त्यापैकी गेल्या एका वर्षात केवळ 10 टक्केच वाढ झाली आहे. अशातच आता सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा फटका बसणारी बातमी समोर आली आहे. सुधा शक्ती दुधाच्या दरात 1 रुपयाने वाढ झाली असून आजपासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून दुधाचे नवे दर लागू होणार आहेत.
सुधा शक्ती दुधाच्या दरात 1 रुपयाने वाढ झाली आहे. आता सुधा शक्ती दुधाचा दर 54 रुपयांऐवजी 55 रुपये प्रतिलिटरने विकले जाणार आहे. तर दुसरीकडे लस्सीचे वजन आणि किंमत या दोघांमध्ये घट करण्यात आली आहे. आता साधा लस्सी पॅक 150 ml ऐवजी 140 ml मध्ये मिळणार आहे. त्यामुळे लस्सी पिणे सर्वसामान्यांना परवडणार असून त्याची किंमत दोन रुपयांनी कमी झाली आहे. सुधा प्लेन लस्सी 12 रुपयांऐवजी 10 रुपयांना मिळणार आहे. तर 80 ग्रॅम वजनाचे मिस्टी दही आता 12 रुपयांऐवजी 10 रुपयांना मिळणार आहे. या किंमतीतील 1 फेब्रुवारी 2024 पासून बदल करण्यात येत आहे.
यासंदर्भात पाटणा डेअरी प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक वैशाल पाटलीपुत्र मिल्क प्रोड्युसर्स कोऑपरेटिव्ह युनियन लिमिटेड यांनी, दुधाच्या दरात सुधारणा करण्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यापूर्वी सुधा शक्ती दुधाच्या दरात तीन रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यापूर्वी सुधा शक्ती 51 रुपये प्रतिलिटर आणि 54 रुपये प्रतिलिटर होती. तर वितरक आणि किरकोळ विक्रेत्याचे मार्जिन वाढवले आहे. पूर्वी किरकोळ विक्रेते एक किलो तूप विकून 30 रुपये वाचत होते. त्यात आता 45 रुपयांची बचत होणार आहे. सुधा तूप पॉली पॅक सॅशेची किंमत 630 रुपये प्रति लीटर आहे. 500 मिली तुपाची किंमत 315 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
दुधाचे दर वाढण्याचे प्राथमिक कारण म्हणजे उत्पादन खर्चात झालेली वाढ. जागतिक दुधाच्या उत्पादनाच्या 22% पेक्षा जास्त असलेला भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे.
फुल-क्रीम दुधाचा दर जून 2023 मध्ये 9.86 टक्क्यांनी वाढून 64.6 रुपये प्रति लिटर झाला आहे, जो मागील वर्षीच्या कालावधीत 58.8 रुपये प्रति लिटर होता . "पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग (DAHD), भारत सरकार देशातील दुधाची खरेदी आणि विक्री दर नियंत्रित करत नाही.