नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या आधी जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांनी एक मोठा कट उधळला आहे. जम्मूच्या गांधी नगरमध्ये एका दहशतवाद्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 8 ग्रेनेड हस्तगत केले आहे. इरफान हुसेन असं या दहशतवाद्याचं नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार हुसेन हा जम्मू येथून 8 ग्रेनेड दिल्लीला घेऊऩ चालला होता. 'हरकत उल अंसार गजवा ए हिंद' या संघटनेचा हा दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
रिपोर्ट्सनुसार, जम्मू येथून नवी दिल्ली येथे जातांना बसमध्ये या दहशतवाद्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आणि दहशतवाद्याला अटक केली.