Saurabh Kripal : देशातील पहिले समलिंगी न्यायाशीध सौरभ कृपाल, जाणून घेऊया संपूर्ण माहिती

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने वकील सौरभ कृपाल यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश

Updated: Nov 16, 2021, 12:01 PM IST
Saurabh Kripal : देशातील पहिले समलिंगी न्यायाशीध सौरभ कृपाल, जाणून घेऊया संपूर्ण माहिती  title=

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून वकील सौरभ किरपाल यांच्या नावाची शिफारस केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे सौरभ कृपाल हे पहिले समलिंगी न्यायाधीश असतील.  कॉलेजियमची ही शिफारस समलिंगी हक्कांच्या लढ्यात मैलाचा दगड मानली जात आहे. 

सिफारशीवर वाद 

2018 पासून त्यांचा न्यायमूर्तीपदावर दावा होता, पण तेव्हापासून त्यांना 4 वेळा ते पुढे ढकलले होते. न्यायमूर्ती रमण यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियमने 11 नोव्हेंबरमध्ये महत्वाची बैठक घेतली. या बैठकीनंतर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांच्या नावाची शिफारस केली. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी मुख्य न्यायमूर्तींव्यतिरिक्त न्यायमूर्ती यू यू ललित आणि न्यायमूर्ती एएम खानविलकर हेही कॉलेजियमचे सदस्य आहेत.

एप्रिलमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सौरभने सरकारच्या आक्षेपाबाबत सांगितले होते, “माझ्या 20 वर्षा आधीच्या जोडीदार हा विदेशी वंशाचा होता. त्याच्यामुळे सुरक्षेला धोका असणे हे विधान चुकीचे आहे. हे चुकीचे विधान आहे. त्यामुळे माझ्या लैंगिकतेमुळे माझ्या नावाचा विचार केला गेला नाही असे मला वाटते."

कपिलच्या नावाची शिफारस देखील महत्त्वाची आहे कारण सप्टेंबर 2018 मध्ये, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकता कलम 377 अंतर्गत गुन्हेगार ठरवल्याचा निर्णय दिला होता, त्या वेळी ते दोन मुख्य याचिकाकर्ते नवतेज जोहर आणि रितू दालमिया यांचे वकील होते.

सौरभ हा सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश बीएन किरपाल यांचा मुलगा आहे. त्यांनी ऑक्सफर्ड आणि केंब्रिजसारख्या प्रतिष्ठित ठिकाणी शिक्षण घेतले आहे. त्यांना वकिली क्षेत्रात जवळपास 2 दशकांचा अनुभव आहे.