अभिषेक राज, मेवात-हरीयाणा : जीवनावश्यक गोष्टींमध्ये दूध (Milk) आहे. मात्र दररोज तुमच्या घरी येणारं दूध खरंच शुद्ध आहे का? की त्यामध्ये बेमालूम भेसळ केली आहे. आम्ही असं का म्हणतोय. त्यासाठी पाहा या स्पेशल रिपोर्ट. म्हशीच्या दुधाच्या (Buffalo milk) विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह आहे. असं आम्ही का म्हणतोय. ते पाहा. दिल्लीपासून 100 किलोमीटर दूर हरीयाणातील मेवात गाव नकली दुधाचा (Adulterated milk) हॉटस्पॉट आहे. 'झी मीडिया'ची टीम या गावात पोहोचली. तेव्हा काय वास्तव समोर आलं ते पाहा.
शुद्ध दुधात भेसळ केली जातेय. बनावट दूध बनवण्याचा पांढरा लिक्विडचा फार्म्यूला आहे. तुम्ही ऐकलं असेल दूधात डिटर्जेंट, स्टार्च, युरीया, रिफाईन ऑईलची भेसळ केली जाते. मात्र तुम्ही ज्या दोन लोकांना नकली दूध बनवताना पाहताय. त्यांचा दावा आहे की हा फार्म्यूला वेगळा आहे. (Adulterated buffalo milk is dangerous to health)
ज्यामध्ये पाण्यात रसायन मिसळून दूध तयार केलं जातंय. एक किलो पावडर आणि 10 लिटर पाणी मिसळलं जातंय. या दुधाला कोणतीही वेगळी चव नाही. यापासून पनीर, मिठाई, चहा बनवला जातोय. दिल्लीपासून गुरुग्रामपर्यंत या दुधाचा पुरवठा होत आहे. दोन्ही प्रकारचं दूध घेऊन झी मीडियाची टीम प्रयोगशाळेत गेली. चाचणीत जो खुलासा समोर आला तो आश्चर्यकारक आहे.
शुद्ध दुधाची फॅटची मात्रा 11.32 आहे. तर नकली दुधाची फॅटची मात्रा 6.71आहे. फॅटचं संतुलीत प्रमाण 7.8 च्या जवळ असतं. शुद्ध दुधातील प्रोटीनची मात्रा 3.7 आहे. तर बनावट दुधात ही मात्रा 3.25 आहे. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या निकषावर हे नकली दूध कसोटीला उतरलंय हे धक्कादायक आहे.
नकली दूध विज्ञानाच्या डोळ्यात धूळ फेकतंय. भेसळीचं दूध पिणं आरोग्याला धोकादायक असल्याचं डॉक्टर सांगतात. भारतात दोन लाख गावांमध्ये दूध संकलनाचं आणि विक्रीचं काम होतं. देशात सहा लाख कोटींचा दुधाचा व्यवसाय आहे. भेसळीच्या दुधाचा व्यवसाय रोखला नाही तर २०२५ पर्यंत ८७ टक्के लोकांना कॅन्सरचा धोका असल्याचा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला दिलाय.