आज रात्री दिसणार आकाशात उल्कापातचं सुंदर दृष्य

जर ढग आणि प्रदूषणाने अडचण उभी नाही केली तर मग आकाशात एक अविस्मरणीय दृष्य पाहण्यासाठी तयार राहा.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 13, 2017, 01:06 PM IST
आज रात्री दिसणार आकाशात उल्कापातचं सुंदर दृष्य title=

मुंबई : जर ढग आणि प्रदूषणाने अडचण उभी नाही केली तर मग आकाशात एक अविस्मरणीय दृष्य पाहण्यासाठी तयार राहा.

जगभरात दिसणार

तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलात तरी तुम्हाला उल्कापात पाहता येणार आहे. १३ डिसेंबरच्या रात्री तुम्ही हा नयमरम्य दृष्य पाहू शकणार आहात. उल्कापात याला 'जेमिनीड मिटियोर शॉवर देखील म्हणतात. 

आकाशातील सुंदर दृष्य

एमपी बिर्ला प्लॅनेटेरियमचे संचालक देवी प्रसाद दुर्य यांनी सांगितले की, आकाशात उल्कापातचे सुंदर असं दृष्य पाहण्यासाठी मोकळ्या जागेत जावं लागेल. अंधार आणि मोकळ्या जागेतून ते आणखी सुंदर दिसेल. 

कधी दिसणार

हा उल्कापात पाहण्यासाठी दुर्बिनीची आवश्यकता नाही आहे. उघडया डोळ्यांनी देखील ते पाहता येणार आहे. हा उल्कापात १३ डिसेंबरला रात्री १० वाजता सुरु होणार असून मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.