बंगळुरूत रस्त्यावर अवतरली मत्स्यगंधा

बंगळुरूच्या रस्त्यावर मत्स्यगंधा अवतरली. बंगळुरूच्या रस्त्यावरील निळ्याशार पाण्याच्या बाजूला ही मत्स्यगंधा सर्वांना दिसून आली.

Updated: Oct 13, 2017, 04:50 PM IST

बंगळुरू : बंगळुरूच्या रस्त्यावर मत्स्यगंधा अवतरली. बंगळुरूच्या रस्त्यावरील निळ्याशार पाण्याच्या बाजूला ही मत्स्यगंधा सर्वांना दिसून आली. लोकांनीही तिला डोळे भरून पाहिलं आणि बंगळुरूचा नेमका काय प्रॉब्लेम आहे, हे देखील त्यांना दिसलं.

खरंतर बंगळुरूच्या खड्यांविरोधात स्थानिक कलांकारांनी हे अनोखं आंदोलन केलं आहे, बंगळुरूतील खड्ड्यांचं खरं स्वरूप सर्वांसमोर येण्यालाठी ही सोनू गोडवा ही अभिनेत्री मत्स्यगंधा झाली. तर ही सुंदर करामत करून दाखवली होती, ती स्ट्रीट आर्टिस्ट नंजुनदास स्वामीने.

मुंबईतही खड्ड्यांचा प्रश्न समोर आला असताना, आरजे मलिष्काने सोनू तुला मायावर भरोसा नाही का या गाण्याच्या माध्यमातून मुंबईतील खड्ड्यांचा प्रश्न अधोरेखित केला होता, त्यावेळी मलिष्का आणि शिवसेना नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. मलिष्काच्या या व्हिडीओला नेटीझन्सने चांगलाच प्रतिसाद दिला होता.