तुम्ही यांना 'कुंभकरण' म्हणाल पण ही व्यक्ती 'या' आजाराने त्रस्त

व्यक्ती वर्षातून 300 दिवस झोपते, झोपेतच जेवते.. दुर्मिळ आजाराने त्रस्त 

Updated: Jul 14, 2021, 02:43 PM IST
तुम्ही यांना 'कुंभकरण' म्हणाल पण ही व्यक्ती 'या' आजाराने त्रस्त  title=

मुंबई : राजस्थानच्या नागौर परिसरातील एक दुर्मिळ आजाराने पीडित व्यक्ती समोर आली आहे. येथील भादवा गावातील एक व्यक्ती तब्बल 300 दिवस झोपते. या व्यक्तीचं नाव आहे पुरखाराम. ज्यांना झोपल्यानंतर उठणं कठीण होतं. त्यांच्या घरातील लोकं त्यांना झोपेतच जेवण भरवतात. हा अजबच आजार पहिल्यांदा समोर आला आहे. (Meet the real life Kumbhakaran who sleeps for 300 days in a year )

स्थानिक लोकं 'कुंभकरण' म्हणून बोलवतात 

पुरखाराम यांचं 42 वय असून त्यांना हा आजार बराच काळापासून आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुरखाराम झोपले की ते तब्बल 20 ते 25 दिवस झोपूनच राहतो. यामधल्या दिवसात जर काही महत्वाचं काम आलं तर कुटुंबावर मोठं संकट ओडवतं. कारण पुरखाराम यांना उठवणं अतिशय कठीण असतं. 

पुरखाराम यांना वयाच्या 18 व्या वर्षी या आजाराची लागण झाली. सुरूवातीच्या काळात ते 5 ते 7 तासच झोपायचे. तेव्हा देखील त्यांनी डॉक्टरांना दाखवलं. मात्र कोणताच उपाय त्यांना लागू पडला नाही. 

पुरखाराम यांचा झोपेचा वेळ हळूहळू वाढू लागला. डॉक्टरांनी देखील हा दुर्मिळ आजार असल्याच म्हटलं. हायपरसोम्निया (Hypersomnia) या आजाराने पुरखाराम त्रस्त होते. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आजार ठीक होणार नाही असं नाही. पण याला प्रॉपर ट्रिटमेंटची गरज आहे. 

डॉक्टर या आजाराला दुर्मिळ आजार म्हणत आहेत. मात्र पुरखाराम यांच्या कुटुंबियांनी आशा कायम ठेवली आहे. त्यांची पत्नी लिछमी देवी यांच म्हणणं आहे की,'गावात त्यांचं एक दुकान आहे. मात्र ते कायमच या आजारामुळे बंद असते. ते या दुकानात काम करता करता झोपतात. मात्र पुढे काय होणार? हाच प्रश्न साऱ्यांना पडला आहे. '