नाही मिळालं लोन, वडिलांनी जमीन विकून मुलीला शिकवलं, 19 वर्षीय तरूणी बनली पायलट

जिद्दीने पूर्ण केलं स्वप्न... कमी वयात कर्मशिअल पायलट 

Updated: Sep 23, 2021, 11:22 AM IST
नाही मिळालं लोन, वडिलांनी जमीन विकून मुलीला शिकवलं, 19 वर्षीय तरूणी बनली पायलट  title=

मुंबई : स्वप्न सत्यात उतरावयला हिम्मतीची गरज असते. हिम्मत आणि जिद्द असेल तर तुम्ही अशक्य ते शक्य करू शकता. असंच घडलंय गुजरातमधील सुरतमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलीसोबत. 19 वर्षीय मैत्री पटेल हीच सगळीकडेच कौतुक होत आहे. 

कमी वयात मैत्री पटेल कर्मशिअरल प्लेन पायलट झाली आहे. आपल्या वडिलांची एकुलती एक मुलगी मैत्रीने आपल्या हिम्मत आणि जिद्दीने स्वप्न पूर्ण केलं आहे. मैत्रीला शिक्षणाकरता लोन मिळत नव्हतं. तेव्हा तिच्या शेतकरी वडिलांनी आपली जमीन विकली आणि तिचं शिक्षण पूर्ण केलं. 

लहानपणापासूनच व्हायच होतं पायलट 

मैत्रीने अमेरिकेत विमान उडवण्याच ट्रेनिंग घेतली आहे. तिला लहानपणापासूनच पायलट व्हायच होतं. Metas Adventist Schoolमधून बारावीचं शिक्षण घेतल्यानंतर मैत्रीने पायलट होण्याच ट्रेनिंग घेतलं. तिचे वडिल शेतकरी असून सुरतमधील म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये काम करतात. 

लवकरच पूर्ण केली ट्रेनिंग 

पायलट होण्याच ट्रेनिंग पूर्ण करण्यासाठी 18 महिने लागतात. मात्र मैत्री पटेलने हे ट्रेनिंग 12 महिन्यातच पूर्ण केलं आहे. मैत्रीला आता कमर्शिअल प्लेन उडवण्याचं परवाना मिळालं आहे. 8 वर्षांची असल्यापासून मैत्री हे स्वप्न पाहत आहे. तिचं वयाच्या 19 व्या वर्षी हे स्वप्न पूर्ण झालं. आता तिला कॅप्टन व्हायच आहे. 

स्वप्न होतंय साकार 

मैत्रीने सांगितलं की, ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर मी माझ्या वडिलांना अमेरिकेत बोलावलं. 3500 फूट उंचीवरून विमान चालवलं. स्वप्न सत्यात साकार झाल्यासारखं आहे. आता भारतात ट्रेन पूर्ण करण्यासाठी तिला काही ट्रेनिंग पूर्ण करावं लागणार आहे. 19 व्या वर्षी पायलट होऊन मैत्री पटेलने कर्मशिअल पायलट होण्याचं स्वप्न साकार केलं आहे.