एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचं रॅगिंग, 'मुंडण' करून 'जी हुजूर'च्या घोषणा

धक्कादायक म्हणजे, रॅगिंगचा असा काही प्रकार घडलाचं सांगत ज्युनिअर विद्यार्थ्यांनी काही बोलण्यास नकार दिला 

Updated: Aug 23, 2019, 12:44 PM IST
एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचं रॅगिंग, 'मुंडण' करून 'जी हुजूर'च्या घोषणा  title=

इटावा : उत्तरप्रदेशातील सैफर्ईमध्ये एमबीबीएसच्या तब्बल १५० विद्यार्थ्यांच्या रॅगिंगचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या विद्यार्थ्यांचे 'मुंडन' करून त्यांना एका रांगेत चालायला लावून 'जी हुजूर' अशा घोषणा देण्यास भाग पाडलं गेलं. सॅल्युट न केल्यानं विद्यापीठातील सीनियर विद्यार्थ्यांकडून ज्युनिअर विद्यार्थ्यांचं रॅगिंग करण्यात आल्याचं समजतंय. या प्रकरणाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

'उत्तरप्रदेश वैद्यकीय विज्ञान विद्यापीठात' झालेल्या या कथित रॅगिंग प्रकरणात डीएम जे बी सिंह यांनी शासनाकडे अहवाल धाडलाय. धक्कादायक म्हणजे, रॅगिंगचा असा काही प्रकार घडलाचं सांगत ज्युनिअर विद्यार्थ्यांनी काही बोलण्यास नकार दिला.

तर व्हिसी डॉक्टर राजकुमार यांनी, मेडिकल कॉलेजमध्ये सगळ्यांना केस कापण्याचा नियम लागू आहे. त्याला रॅगिंग म्हणता येणार नाही. तसंच एका रांगेत चालणं हा अनुशासनाचा प्रकार असल्याचं स्पष्टीकरण दिलं.