मारूतीचा शेअर गेला 9000 च्या पलीकडे...

मारूती सुझुकीच्या शेअरने 9,199.95 ची पातळी गाठली आहे.

Updated: Dec 9, 2017, 05:16 PM IST
मारूतीचा शेअर गेला 9000 च्या पलीकडे... title=

नवी दिल्ली : मारूती सुझुकीच्या शेअरने 9,199.95 ची पातळी गाठली आहे.

नवा उच्चांक

नवा उच्चांक गाठत मारूती सुझुकीच्या शेअरने 9000 चा टप्पा पहिल्यांदाच पार केला. या वाहन उत्पादक कंपनीने 2017 या वर्षात 71 टक्के वाढ नोंदवली आहे.

पहिल्या पाचात

मोतीलाल ओसवाल या आघाडीच्या आर्थिक संस्थेच्या एका अहवालानुसार मारूती सुझुकीला संपत्ती निर्माण करण्याच्या यादीत 5 वं स्थान दिलं आहे. गेल्या 5 वर्षात 1.41 लाख कोटींचं भाग भांडवल कंपनीने उभं केलं आहे.

स्विफ्ट, एस्टिलो, डीझायर आणि बॅलेनो लोकप्रिय

मारूती सुझुकी ही देशातली सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे.
या वर्षी आतापर्यंत 1,45,300 कारची विक्री मारुतीने केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी कंपनीने विक्रीमध्ये 15 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. यात स्विफ्ट, एस्टिलो, डीझायर आणि बॅलेनोचा वाटा महत्वाचा आहे.