Difference Between Court Marriage and Marriage Registration: लग्न हा आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा (Marriage) टप्पा आहे. आपल्या आयुष्यात आपल्याला कधी ना कधी तरी या टप्प्यावर यावेच लागते. आता अनेक तरूण - तरूणी जे लग्नासाठी वधू आणि वराचा शोध घेत आहेत त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची (Marriage Act) आहे. लग्न आणि त्यासंबंधीचा कायदा आपल्या माहिती असणे महत्त्वाचे असते. त्यातून तरूण पिढीला यासंबंधीची माहिती असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकदा अनेकांना कोर्ट मॅरेज आणि मॅरेज रजिस्ट्रेशन (Difference Between Court Marriage and Marriage Registration) यातील फरक कळून येत नाही. त्यातून आजकाल लग्नाचा खर्च कमी करत अनेक तरूण जोडपी हे कोर्ट मॅरेजही करताना दिसत आहेत. तेव्हा या दोन संज्ञामधील फरक काय आहेत, कोर्ट मॅरेज आणि मॅरेज रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशी असते?, ती वेगळी असते का, देशातील यासंदर्भातील कायदा काय आहे ते या लेखातून जाणून घेऊया.
अनेकदा लोकांना कोर्ट मॅरेज आणि मॅरेज रजिस्ट्रेशन (Marriage Law in India) या दोन गोष्टी या सारख्याच वाटतात. परंतु त्यात फरक आहे. 1954 पासून विशेष विवाह कायदा म्हणजेच स्पेशल मॅरेज अॅक्ट भारतीय न्यायलयानं लागू केला (Special Marriage Act) आहे त्यानूसार कुठल्याही जाती, धर्म आणि संस्कृतीतील व्यक्ती एकमेकांशी लग्न करू शकतात. यासाठी जोडपी ही विवाह निबंधक कार्यालयात विवाह प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)