'बाईक सोबत 32 इंच टीव्ही फ्री', या शब्दाला भुलला आणि स्वत:चं नुकसान करुन बसला...

परंतु बराच वेळ उलटल्यानंतर जेव्हा मॅनेजर आला नाही, तेव्हा हा व्यक्ती शोरूमच्या कर्मचाऱ्यांकडे गेला.

Updated: Jun 7, 2022, 06:22 PM IST
'बाईक सोबत 32 इंच टीव्ही फ्री', या शब्दाला भुलला आणि स्वत:चं नुकसान करुन बसला... title=

मुंबई : स्वत:ची गाडी विकत घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपल्या स्वत:च्या मेहनतीच्या पैशांनी विकत घेतलेल्या गाडीतून फिरण्यात जी काही मजा आहे. ती फार वेगळी आहे. असाच एक व्यक्ती गाडी विकत घेण्याचा विचार करत होता. परंतु तो काहीही करता एक गाडी फायनल करु शकत नव्हता. परंतु एक दिवस असं काही घडलं की, तो व्यक्ती बाईक घेण्यासाठी लगेच तयार झाला.

खरंतर झालं असं की, जेव्हा साग्निक सरकार नावाचा व्यक्ती बाईक घेण्यासाठी एका शोरुममध्ये गेला, तेव्हा तेथील मॅनेजरने त्याला सांगितले की, जर तु या शोरुममधून बाईक विकत घ्याल, तर तुम्हाला 32 इंच टीव्ही फ्री मिळेल. मग काय बाईक सोबत फ्री फ्रीज किंवा टीव्ही कोण नाकारेल?

फ्री ऑफर ऐकून साग्निक शोरूममध्ये पोहोचला , फ्री टीव्हीची ऑफर साग्निकच्या कानावर पडताच त्याने लगेच शोरूमच्या मॅनेजरला भेटला. शोरूममधील सर्व डॉक्यूमेंटेशन पूर्ण केल्यानंतर तो मेनेजरला गाडीसाठी आधी 30 हजार रुपये पुढे करतो आणि उर्वरित पैसे हप्त्याने भरणार असल्याचे सांगतो. त्यानंतर मॅनेजर त्याला थांब म्हणून सांगतो आणि कुठेतरी निघून जातो.

परंतु बराच वेळ उलटल्यानंतर जेव्हा मॅनेजर आला नाही, तेव्हा हा व्यक्ती शोरूमच्या कर्मचाऱ्यांकडे गेला आणि त्यांच्याकडून आपली गाडी मागितली. परंतु जेव्हा या कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले तेव्हा त्यांना त्याला काही कळे ना सं झालं.

या व्यक्तीने सांगितले की, मी मॅनेजरला पैसे दिले आहेत आणि सगळं डॉक्यूमेंटेशन झालं आहे. परंतु त्यावेळेस शोरुमचे कर्मचारी त्याला म्हणाले की, आज त्यांचा मॅनेजर आलेलाच नाही, त्यामुळे तुम्ही कोणाला पैसे दिलेत, हे आम्हाला माहित नाही.

आता काय करावे हे साग्निकला समजत नव्हते, पण आपली फसवणूक झाली आहे हे त्याला नक्की समजले होते.

संपूर्ण प्रकरण सीसीटीव्हीत कैद

या प्रकरणाची माहिती मॅनेजरला मिळताच त्यांनीही तात्काळ शोरूम गाठून सीसीटीव्ही पाहिले. फुटेज पाहिल्यानंतर त्यामध्ये दिसणारी व्यक्ती ही शोरूममधील नसल्याचे सांगितले.

यानंतर साग्निकने कोतवाली पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. माझ्यासोबत हे कसे घडले याची मला कल्पना नसल्याचे साग्निकने सांगितले. पोलिसांनी त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या ठग्याला शोधून काढू असे सांगितले.

दुसरीकडे, शोरूमचे सेल्स मॅनेजर कार्तिक बोस यांनी सांगितले की, ठगने स्वत:ची ओळख रेल्वे अधिकारी म्हणून दिली होती आणि तो म्हणत होता की त्याला 20 बाइक घ्यायच्या आहेत आणि आज तो 2 बाइक घेईल. तसेच तो पीडित साग्निकला आपला माणूस असल्याचे सांगत होता, त्यामुळेच आमच्या शोरूममध्ये कोणालाही त्याचा संशय आला नाही.