पूल कोसळला, पुलावरील ५ कार आणि १ बससह पूल ढासळला

दक्षिण कोलकात्यातील मेजरहाट पूल कोसळला आहे. पूल कोसळला तेव्हा पुलावर ५ कार आणि १ बस मार्गक्रमण करीत होती. 

Updated: Sep 4, 2018, 05:52 PM IST
पूल कोसळला, पुलावरील ५ कार आणि १ बससह पूल ढासळला title=

कोलकाता : दक्षिण कोलकात्यातील मेजरहाटमध्ये तारातला पूल कोसळला आहे. पूल कोसळला तेव्हा पुलावर ५ कार आणि १ बस मार्गक्रमण करीत होती. पूल कोसळल्यानंतर कार आणि बस तसेच त्याच जागी कोसळले आहेत.या घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आहे, किंवा नाही याची माहिती अजून मिळू शकलेली नाही. या पुलाखाली काही वाहन दबली गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

अपघातस्थळी बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. काही वाहनं पूल कोसळल्यानंतर पुलावरच अडकली आहेत. पूल कोसळल्यानंतर वीज कनेक्शन देखील बंद झालं आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे, आणि पुलाखाली दबल्या गेलेल्यांना बाहेर काढणे, हे आमचं प्रथम लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलंय. तर भाजप खासदार बाबूल सुप्रियो यांनी यात राज्य सरकारला जबाबदार धरत, निष्पाप लोकांचा यात बळी गेला असल्याचं सांगितलं आहे, पूल वाहतुकीसाठी बंद का केला गेला नाही, कारण या पूल जीर्ण झाला होता, असा आरोप सुप्रियो यांनी केला आहे.

या पुलाखाली काही वाहन दबली गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघातस्थळी बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. काही वाहनं पूल कोसळल्यानंतर पुलावरच अडकली आहेत. पूल कोसळल्यानंतर वीज कनेक्शन देखील बंद झालं आहे.

कोलकाता २०१६ मध्ये देखील असाच अपघात झाला होता. गिरिश नगर पार्कमध्ये पूल बांधतांना ३१ मार्च २०१६ रोजी पूल कोसळला होता. या घटनेत २७ लोकांचा मृत्यू झाला होता, आणि ७० पेक्षा जास्त जखमी झाले होते.