सोन्याच्या दरांमध्ये लागोपाठ दुसऱ्या दिवशी मोठी घसरण

आंतरराष्ट्रीय बाजारातल्या कमजोरीमुळे मंगळवारी सोन्याचे भाव कमी झाले.

Updated: Sep 4, 2018, 04:59 PM IST
सोन्याच्या दरांमध्ये लागोपाठ दुसऱ्या दिवशी मोठी घसरण title=

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारातल्या कमजोरीमुळे मंगळवारी सोन्याचे भाव कमी झाले. सोन्याचे दर ५० रुपयांनी पडून ३१,२०० रुपये प्रती १० ग्रॅम झाले आहेत. सोन्याचे भाव कमी झाले असले तरी चांदीचे दर मात्र वाढले आहेत. चांदीचे भाव १५० रुपयांनी वाढून ३७,८५० रुपये प्रती किलो झाले आहेत. सोनं व्यापाऱ्यांची कमी झालेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारामुळे सोन्याचे दर कमी झाले आहेत.

दिल्लीच्या सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचे दर ३१,२०० रुपये आणि ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचे दर ३१,०५० रुपये प्रती तोळा आहेत. सोमवारी सोन्याचे दर १०० रुपयांनी घसरले होते. पण ८ ग्रॅम सोन्याच्या विटांचे दर २४,५०० रुपयांवर कायम आहे.