मंत्रिमंडळ फेरबदलात शिवसेनेला अधिक महत्त्वाची खाती ?

राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलांच्या हालचालींनी वेग

Updated: Oct 15, 2018, 11:05 PM IST
मंत्रिमंडळ फेरबदलात शिवसेनेला अधिक महत्त्वाची खाती ? title=

मुंबई : राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलांच्या हालचालींनी वेग घेतला असताना आता शिवसेनेला अधिक महत्त्वाची खाती दिली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या अखेरच्या वर्षात अधिक महत्त्वाची खाती शिवसेनेच्या वाट्याला दिली जाऊ शकतात.

मोठे फेरबदल 

यादी निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये दाखल झाले असून ते आज रात्री भाजपा अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेणार आहेत.

या बैठकीतच मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांना हिरवा कंदील मिळणार आहे.

दसऱ्यानंतर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जातेय.