एन्काऊंटरवेळी बंदूक न चालल्याने तोंडाने 'ठॉय-ठॉय' आवाज काढणारा पोलिस म्हणतो...

 या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आलीयं.

Updated: Oct 15, 2018, 05:01 PM IST
एन्काऊंटरवेळी बंदूक न चालल्याने तोंडाने  'ठॉय-ठॉय' आवाज काढणारा पोलिस म्हणतो...  title=

उत्तर प्रदेश :  एन्काऊंटर करायला गेलेल्या पोलिसांची बंदूक ऐनवेळी न चालल्याने त्यांनी तोंडानेच 'ठॉय-ठॉय' असा आवाज काढल्याची हास्यास्पद घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती.  'ठॉय-ठॉय' आवाज काढणाऱ्या पोलिसाच्या सहकाऱ्याने काढलेला हा व्हिडिओ सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून बंदूक चालविणाऱ्या पोलिसाला बंदूक चालविण्याच्या ट्रेनिंगला पाठविणार असल्याचे एसपी यमुना प्रसाद यांनी सांगितलं. तुर्तास त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं. 

दरम्यान  'ठॉय-ठॉय' असा आवाज काढणाऱ्या पोलिसानेही या प्रकरणावर आपले मौनं सोडलंय. मनोज कुमार असं त्यांच नाव असून ते गेली 28 वर्ष पोलीस दलात कार्यरत आहेत. 'एन्काऊंटर करताना माझी बंदूक जॅम झाली म्हणून गुन्हेगारांवर दबाब वाढविण्यासाठी मी तोंडाने मारा-मारा, घेरा-घेरा असं ओरडायला सुरूवात केल्याचे' ते सांगतात.  गुन्हेगार तेव्हा उसाच्या शेतात लपले होते.

एक सापडला, एक फरार 

या सर्व प्रकरणानंतर पोलिसांनी 25 हजार बक्षीस असलेल्या मुदित शर्मा या गुन्हेगाराला अटक केली तर एकजण पळण्यास यशस्वी झाला.

यावेळी एक पोलीस इन्स्पेक्टर आणि शिपायालाही गोळ लागली. दोघांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलंय.

जेव्हा दोन्हीकडून फायरिंग सुरू असते तेव्हा पोलिसांच्या जिवालाही धोका असतो असं त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटलं होतं.

तेव्हा नेमकं काय झालं होतं ?

संभल पोलीस गुन्हेगारांचा पाठलाग करत जंगलापर्यंत पोहचले... यावेळी, त्यांच्याकडे शस्रही होते... गुन्हेगार काही अंतरावर असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी आपली शस्र सज्ज केली... काही पोलिसांनी गोळ्याही झाडल्या... परंतु, एका पोलीस उपनिरीक्षकाला मात्र त्याच्या बंदुकीनं दगा दिला.

प्रयत्न करूनही बंदुक चालत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांना तोंडानंच 'ठॉय-ठॉय'चा आवाज काढावा लागला. 

ही घटना १२ ऑक्टोबर रोजी घडली. असमोली पोलीस स्टेशनचे पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये ही चकमक झाली. शस्रांनी दगा दिल्यानंतरही पोलिसांनी एका गुन्हेगाराला अटक केलीय. या गुन्हेगारावर २५ हजार रुपयांचं बक्षीसही होतं. तर दुसरा गुन्हेगार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला.

या चकमकीत एक इन्स्पेक्टर आणि एक पोलीस शिपाई गंभीररित्या जखमी झालेत. जखमींना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शस्रांनी दगा दिल्यानंतर 'ठॉय-ठॉय' आवाज तोंडातून काढणाऱ्या पोलिसांना मात्र सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय.