'लोकं मरणाच्या दारावर...'महाकुंभतील चेंगराचेंगरीच्या आधी मराठी तरुणीने केलं होतं अलर्ट!

Mahakumbh Stampede: किशोरी असं या मराठी तरुणीचं नाव असून एक्स्प्लोअर विथ किशोरी असं तिच्या सोशल मीडिया हॅण्डलचं नाव आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 29, 2025, 02:45 PM IST
'लोकं मरणाच्या दारावर...'महाकुंभतील चेंगराचेंगरीच्या आधी मराठी तरुणीने केलं होतं अलर्ट! title=
कुंभमेळा चेंगराचेंगरी

Explore with Kishori on Mahakumbh Stamping: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभ मेळ्यात देशविदेशातील नागरिकांसह भारतातूनही मोठ्या संख्येनं पर्यटक, भाविक जमले आहेत.साधूसंतांची वर्णी असणाऱ्या या ठिकाणी बुधवारी पहाटेच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. मौनी अमावस्येचं निमित्त साधत पवित्र गंगा स्नानासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. बघता बघता गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. यात काहींना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान चेंगराचेंगरीची घटना होण्याआधीच एका मराठी तरुणीनं आपल्या व्लॉगमध्ये या चेंगराचेंगरीबद्दल अलर्ट केले होते. 

किशोरी असं या मराठी तरुणीचं नाव असून एक्स्प्लोअर विथ किशोरी असं तिच्या सोशल मीडिया हॅण्डलचं नाव आहे. ती देशातील वेगवेगळी ठिकाणे एक्स्प्लोअर करत असते. किशोरी कुंभमेळ्यात पोहोचली असता तिथली भीषण परिस्थिती तिच्या लक्षात आली. आणि आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिने गर्दीच्या ठिकाणी न येण्याची कळकळीची विनंती केली. 

पाहा व्हिडीओ

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by किशोरी  (@explore_with_kishori)

जर तुम्हाला खरंच वाटत की मी महाकुंभचे प्रत्यक्ष वेळेतील अपडेट देतेय तर मी तुम्हाला विनंती करते की कृपया पवित्र स्नानाच्या दिवशी महाकुंभला अजिबात येऊ नका. आज मौनी आमावस्येचे पवित्र स्नान आहे. इथली परिस्थिती खूप बेकार झाली. लोकं एकमेकांच्या अंगावर आहेत. चेंगराचेंगरी झालीय. लोकं मरणाच्या दारावर आहेत. सर्वजण स्वत:चा जीव वाचवतायत. कोण कोणाची मदतही करत नाही. 

तुम्हाला यायचंच असेल तर संगम घाटावर अजिबात येऊ नका. अरेल घाट, यमुना घाट इकडे जा. पुण्य कमावण्यापेक्षा जीव वाचवणं खूप महत्वाचं आहे. 

महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरी इतकी भीषण स्वरुपातील होती की इथं अनेकांचाच घटनास्थळी मृत्यू झाला.  घटनेची माहिती आणि महाकुंभसाठी झालेली एकंदर गर्दी पाहता घटनास्थळी तातडीनं रुग्णवाहिका दाखल झाल्या. या संपूर्ण घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांच्याकडून घटनेचा आढावा घेतला.