कूनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्याचा मृत्यू, धक्कादायक कारण समोर

मध्यप्रदेशमधल्या कूनो नॅशनल पार्कमध्ये आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्याचा मृत्यू झाला आहे. मादि चीता धीराच्या मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. यामागे धक्कादायक कारण समोर आलं आहे

राजीव कासले | Updated: May 9, 2023, 08:21 PM IST
कूनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्याचा मृत्यू, धक्कादायक कारण समोर title=

Kuno National Park : दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) भारतात आणलेल्या आणखी एक चित्याचा मृत्यू झाला आहे. दक्षिण आफ्रिकेतील नामिबियातून (Namibia) आलेल्या चित्यांपैकी तिसऱ्या चित्याचा मृत्यू झाला आहे. भारतात 20 चिते आणण्यात आले होते. यापैकी सर्वात आधी शासा या मादि चित्याचा मृत्यू झाला. प्रकृती बिघडल्याने शासाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर कूनो अभयारण्यात (Kuno National Park) उदय नावाच्या चित्याचा मृत्यू झाला होता. आणि आता कूनो अभयारण्यातच धीरा नावाच्या मादि चित्याचा मृत्यू झालाय. 

धीराच्या मृत्यूचं कारण 
आफ्रिकेतून आणण्यात आलेल्या धीरा चित्याचं कूनो अभयारण्यात इतर चित्यांशी लढाई झाली. अभयारण्यातील वन कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फिंडा, वायू आणि अग्नी या चित्यांबरोबर दक्षा आणि धीरा चिते (Dheera Chitah) भिडले. या लढाईत धीराचा मृत्यू (cheetah Dheera dies) झाला. दक्षिण आफ्रिका आणि नामिबियातून आणलेल्या वीस चित्यांपैकी तिघांचा मृत्यू झाल्याने आता 17 चिते उरले आहेत. 

आफ्रिकेतून कूनो अभयारण्यात आलेल्या चित्यांना कोरोना (Corona) काळात क्वारंटाईन करण्यात आलं होतं त्यांच्यावर देखरेख ठेवली जात होती. यापैकी 17 एप्रिलला तीन चित्यांना मोकळ्या अभयारण्यात सोडण्यात आलं. तर 18 आणि 19 एप्रिलला उर्वरित चित्यांनाही मोकळं करण्यात आलं. कूनो अभयारण्यात हरिण, ससे, चीतळ असे अनेक प्राणी मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे चित्यांना शिकारीसाठी मोकळं रान असतं.

नामिबियातून चिते भारतात
गेल्या वर्षी म्हणजे 2022 च्या सप्टेंबर महिन्यात नामिबियातून (Namibia) विशेष विमानाने चित्यांना भारतात आणण्यात आले होतं. त्यानंतर ग्वाल्हेरमधून चित्यांना हेलिकॉप्टरनं नेण्यात आलं. तिथून चित्त्यांची कुनो नॅशनल पार्कामध्ये रवानगी करण्यात आली. सुरुवातीला आणण्यात आलेल्या 8 चित्त्यांमध्ये 5 मादी आणि 3 नर चित्ते होते.  3 नर चित्यांमध्ये 2 सख्खे भाऊ असून त्यांचं वय साडेपाच वर्ष आहे. तिसऱ्या नर चित्याचं वय साडे चार वर्ष आहे. तसंच 5 मादी चित्त्यांचं वय 2 वर्षे ते 5 वर्षांपर्यंत आहे. या चित्यांचं आयुष्य जास्तीत जास्त 12 वर्षे असते, अशी माहिती देण्यात आली आहे.

1948 मध्ये छत्तीसगडमधील साल जंगलात शेवटचा चित्ता  दिसला होता. मोठ्या प्रमाणात शिकारीमुळे देशातून नामशेष झालेल्या चित्ताला परत आणून भारत पर्यावरणीय असंतुलन दूर करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचं मोदी सरकारने सांगितलं होतं.