आपल्या आयुष्यात शिक्षकाची भूमिका खूप खास असते. शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करतो आणि पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो. आयुष्यात शिक्षकाशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे. कोणी कितीही मोठा झाला तरी त्याला नेहमीच मार्गदर्शकाची गरज असते जी एक कुशल शिक्षक पूर्ण करू शकतो. मात्र काही शिक्षक हे याला अपवाद आहेत. असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशात पाहायला मिळाला आहे. मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यातील शिक्षणाचा स्तर सुधारण्यासाठी अनेक चांगले प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे सिंगरौली जिल्ह्यातील कारसुआ राजा मालगा विद्यालयातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका मुख्याध्यापकाने उघडपणे दारूच्या नशेत शाळेत पोहोचत लहान मुलांना शिवीगाळ केली आहे. (madhya pradesh Drunk head master reached school abused students and villagers)
सिंगरौली जिल्ह्यातील माळगा या सरकारी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक राम लल्लू साकेत शनिवारी मद्यधुंद अवस्थेत शाळेत पोहोचले होते. त्यांनी मुले आणि जेवण बनवणाऱ्या व्यक्तीला शिवीगाळ केली. यादरम्यान गावातील एका तरुणाने तुम्ही दारू पिऊन का आलात, अशी विचारणा केली. यानंतर मुख्याध्यापकाने शिक्षकाचे हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला. मुख्याध्यापक सर्वांना शिवीगाळ करू लागले आणि शाळेच्या खुर्च्यांवर पडले. मुख्याध्यापकाने इतकी दारू प्यायली होती की त्यांना स्वतःलाही सांभाळता आले नाही. गावातील एका तरुणाने मुख्याध्यापकांचे हे कृत्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मध्यप्रदेशातील शिक्षकाचा प्रताप, मद्यपान करुन केली विद्यार्थ्याना शिवीगाळ. व्हिडिओ झाला कॅमेऱ्यात कैद, जिल्हाधिकाऱ्यांनी केली निलंबनाची कारवाई..#Madhyapradesh #teacher #ViralVideo #teacherdrinkliquor pic.twitter.com/SpyUUfo9o7
— Pratiksha Bansode (@pratikshapb) November 6, 2022
व्हिडीओ समोर येताच निलंबनाची कारवाई
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी राजीव रंजन मीणा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात मुख्याध्यपकांचा निष्काळजीपणा समोर आला. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले. मद्यधुंद मुख्याध्यापक रामल्लू साकेत वर्षभरापूर्वीही असेच कृत्य करून प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यानंतरही दारूच्या नशेत आणि लोकांना शिवीगाळ करत त्यांनी शाळा गाठली. मात्र विभागाच्या दुर्लक्षामुळे मुख्याध्यापक सातत्याने मद्यप्राशन करून शाळेत येत होते. मात्र यावेळी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.