2 मजली निवासी इमारतीला आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू

Fire Breaks Out : इंदूरच्या स्वर्णबाग कॉलनीतील एका दोन मजली इमारतीला आज शनिवारी पहाटे चार ते पाच वाजण्याच्यादरम्यान भीषण आग लागून सात जणांचा होरपळून मृत्यू झाला.  

Updated: May 7, 2022, 09:44 AM IST
 2 मजली निवासी इमारतीला आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू title=

भोपाळ : Fire Breaks Out : इंदूरच्या स्वर्णबाग कॉलनीतील एका दोन मजली इमारतीला आज शनिवारी पहाटे चार ते पाच वाजण्याच्यादरम्यान भीषण आग लागून सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार ही आग घरातील इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज आहे. (Fire Breaks Out In 2-Storey Residential Building in Indore)

मिळालेल्या माहितीनुसार आगी झागली तेव्हा इमरातीत 15 ते 17 लोक अडकले होते. आग लागल्यानंतर मोठा भडका उडला. या आगीत होरपळून सात जणांचा मृत्यू झाला. आगीच्यार घटनास्थळावरुन एकूण पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.  

 इंदूरचे पोलीस आयुक्त हरिनारायण चारी मिश्रा यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, सात लोकांचा मृत्यू झाला आहे आणि नऊ जणांना वाचविण्यात आले आहे. 

अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी. आग आटोक्यात आणण्यासाठी आम्हाला तीन तास लागले.