लग्नात निरोप देताना बापाला मुलीसोबत..., 'ही' विचित्र पंरपरा पाहून तूम्हाला चीड येईल

लग्न झालेल्या नवरीला निरोप देताना बापाला जे करावं लागतं ते ऐकूण तूम्हाला चीड येईल. इतकी ही वाईट परंपरा आहे.  

Updated: Jun 2, 2022, 06:40 PM IST
लग्नात निरोप देताना बापाला मुलीसोबत..., 'ही' विचित्र पंरपरा पाहून तूम्हाला चीड येईल   title=

मुंबई : जितके देश, तितक्या जाती आणि तितक्याच वेगवेगळ्या परंपरा असतात. काही परंपरा पटतात तर काही परंपरा चीड आणतात. या घटनेत असलेली एक परंपरा जी तूम्हाला चीड आणेल. कारण लग्न झालेल्या नवरीला निरोप देताना बापाला जे करावं लागतं ते ऐकूण तूम्हाला चीड येईल. इतकी ही वाईट परंपरा आहे.  

महाराष्ट्रातील लग्नात कसे, लग्न लागून सासरी चाललेल्या मुलगी बाप आणि आईला मिठी मारते. यानंतर नवऱ्याच्या गाडीत सोडत तिला निरोप दिला जातो. मात्र या घटनेतली परंपरा वेगळीच आहे. मुलीच्या लग्नानंतर निरोपाच्या वेळी वडिलांना एक अतिशय विचित्र प्रथा पाळावी लागते. 

मुलीला निरोप घेताना बाप मुलीवर थुंकून तिला सासरी पाठवतो. वडील घरापासून दारापर्यंत तिच्या डोक्यावर थुंकतात. केनिया आणि टांझानियामध्ये मसाई नावाची जमात अशा विचित्र परंपरेवर विश्वास ठेवतात.मसाई जमातीच्या लोकांना निरोप देताना केला जाणारा हा सर्वात खास विधी आहे. हे प्रत्येक पित्याला करावेच लागते. 

 डोक्यावर थुंकणे हा आशीर्वाद 
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या जमातीचे लोक मुलीचा निरोप घेताना डोक्यावर थुंकणे हा वडिलांचा आशीर्वाद मानतात. जर या काळात वडिलांनी डोक्यावर थुंकले नाही तर असे मानले जाते की त्यांनी आपल्या मुलीला आशीर्वाद दिला नाही, अशी ही विचित्र प्रथा आहे.