नवी दिल्ली : व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ शुक्रवारी घेतली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपती पदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये शपथ ग्रहणाचा कार्यक्रम पार पडला.
या शपथ ग्रहण सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबतच इतरही राजकीय नेते उपस्थित होते.
शपथविधीपूर्वी व्यंकय्या नायडू यांनी राजघाटवर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर व्यंकय्या नायडू संसद भवनाकडे रवाना झाले.
WATCH: M Venkaiah Naidu takes oath as vice president of India https://t.co/7Thd3syWXJ
— ANI (@ANI) August 11, 2017
व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार डॉ. गोपाळकृष्ण गांधी यांचा २७२ मतांनी पराभव केला होता. व्यंकय्या नायडू यांना ५१६ मतं मिळाली होती तर गोपाळकृष्ण यांना २४४ मतं मिळाली होती.