कोण आहेत महामहिम द्रौपदी मुर्मू यांचे डॉक्टर? जाणून घ्या

डॉक्टरांचं यश पाहण्याजोगं...   

Updated: Aug 3, 2022, 07:55 AM IST
कोण आहेत महामहिम द्रौपदी मुर्मू यांचे डॉक्टर? जाणून घ्या  title=
Lt Gen Daljit Singh honorary surgeon Doctor to President Draupadi Murmu

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू विराजमान झाल्या. त्या देशातील आदिवासी वर्गातील पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. एका लक्षवेधी सोहळ्यामध्ये द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या पदाची शपथ ग्रहण केल्यानंतर आता त्यांच्या सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात येत आहे. ( Lt Gen Daljit Singh honorary surgeon Doctor to President Draupadi Murmu)

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार लेफ्टनंट जनरल दलजीत सिंह (director general of medical services- भारतीय सैन्य ) यांची नियुक्ती महामहिम मुर्मू यांचे डॉक्टर म्हणून करण्यात आली आहे. लष्कराकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. 

कोण आहेत Lieutenant General Daljit Singh? 

26 नोव्हेंबर रोजी लष्करातील वैद्यकिय तुकडीची धुरा हाती घेत वरिष्ठ कर्नल पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सिंग यांनी पुण्यातील सैन्यदल वैद्यकिय महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं आहे. 

सिंग यांनी पुणे विद्यापीठातून बालरोगतज्ज्ञ म्हणून एमडी ही पदवी घेतली. 17 डिसेंबर 1983 मध्ये ते भारतीय वायुसेनेत तैनात झाले होते. सध्याच्या घडीला ते लष्कराच्या वैद्यकिय सेवेमध्ये वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ आणि neonatologist म्हणून काम पाहत आहेत. 

2020 मध्ये सिंग यांचा विशिष्ठ सेवा पदकानं गौरव करण्यात आला होता. भारतीय लष्करात दिलेल्या सेवेप्रती त्यांचा सन्मान करण्यात आला होता. 38 वर्षांच्या सेवेमध्ये त्यांनी आतापर्यंत बऱ्याच महत्त्वाच्या पदांवर कामं केली.