घरबसल्या जाणून घ्या गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळते की नाही? फॉलो करा सोप्या स्टेप्स

 अनेक ग्राहकांना हे माहितीच नसतं की त्यांना या योजनेचा फायदा होतो आहे की नाही? 

Updated: Aug 3, 2022, 06:13 PM IST
घरबसल्या जाणून घ्या गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळते की नाही? फॉलो करा सोप्या स्टेप्स title=
lpg gas subsidy status how to check online subsidy status know step by step in marathi

LPG Subsidy  - आज अनेक घरांमध्ये गॅस पाइपलाइन आली आहे. मात्र देशात असंख्य घरात आजही गॅस सिलिंडर घेतला जाता. सरकार दरवर्षी गॅस सिलिंडर ग्राहकांना 12 रुपये सबसिडी (Subsidy) देते. पंतप्रधान उज्ज्वला योजनातर्गंत (PM Ujjwala Yojana) लाभार्थींच्या बँक अकाउंटमध्ये प्रति सिलिंडर 200 रुपये जमा केले जातात. सबसिडीचा फायदा घेण्यासाठी तुमचं आधार कार्ड एलपीजी कनेक्शन लिंक (LPG Connection) असायला हवं. पण अनेक ग्राहकांना हे माहितीच नसतं की त्यांना या योजनेचा फायदा होतो आहे की नाही? 

अशावेळी तुम्ही ऑनलाइन यासंदर्भात माहिती मिळू शकतात.  आज आपण घर बसल्या आनलाइन एलपीजी सबसिडीबद्दल जाणून घेणार आहोत. काही आनलाइन स्टेप्सच्या बद्दल जाणून घेऊयात.( lpg gas subsidy status how to check online subsidy status know step by step in marathi)

या स्टेप्स फॉलो करा

1. स्टेटस चेक करण्यासाठी सगळ्या पहिले अधिकृत वेबसाइट http://mylpg.in/ वर जा.
2. LPG सर्विस प्रोवाइडरला निवडण्यासाठी 'ज्वाइन DBT' या ऑप्शनवर क्लिक करा.
3. जर तुमच्याकडे आधार नंबर नसेल तर DBTL ऑप्शनवर क्लिक करा. 
4. त्यानंतर LPG प्रोवाइडरच्या अधिकृत वेबलाइटवर क्लिक करा. 
5.मग इथे एक तक्रार बॉक्स ओपन होणार, तिथे तुम्ही सबसिडी स्टेटस चेक करु शकता.
6. यानंतर तुम्ही PAHAL ऑप्शनवर क्लिक करा.
7. यानंतर एक डायलॉग बॉक्स उघडणार. त्यात तुम्ही आधार नंबर आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर भरा. 
8. यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला एका भागी 17 नंबरचा LPG आईडी भरा.
9. यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येणार तो भरा. 
10. आता तुम्ही एलपीजीच्या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन होणार. 

आता सबसिडी जाणून घेण्यासाठी हे स्टेप्स फॉलो करा

1. त्यानंतर याची लिंक तुमच्या मेल आइडीवर येणार ज्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
2. या लिंकवर क्लिक केल्यावर तुमचं अकाउंट एक्टिवेट होणार
3.यानंतर पुन्हा http://mylpg.in  अकाउंट पर लॉगिन करा.
4. यानंतर  Booking History आणि Subsidy ऑप्शनवर क्लिक करा.
5. यावर तुम्हाला कळेल की सबसिडी मिळते आहे की नाही.