गॅस सिलेंडर महागला; सलग तीन महिन्यात तिसऱ्यांदा वाढ

गॅस सिलेंडरच्या किंमतीचा आकडा पोहचला...

Updated: Nov 2, 2019, 01:06 PM IST
गॅस सिलेंडर महागला; सलग तीन महिन्यात तिसऱ्यांदा वाढ title=

नवी दिल्ली : तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात करत आहे. तर दुसरीकडे तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा स्वयंपाक घरातल्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Cylinder) किंमतीत वाढ केली आहे. सलग तिसऱ्या महिन्यात एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशननुसार, १ नोव्हेंबरपासून दिल्लीत १४.२ किलो बिना सब्सिडी गॅस सिलेंडर ७६.५० रुपयांनी महागला आहे. आता वाढ झालेल्या सिलेंडरची किंमत ६८१.५० रुपये इतकी झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात हा सिलेंडर ६०५ रुपयांना मिळत होता.

तीन महिन्यांत घरगुती गॅस सिलेंडरच्य किंमतीत १०५ रुपयांची वाढ झाली आहे. तर कमर्शियल सिलेंडर १९३ रुपयांनी वाढला आहे.

१९ किलो कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत ११९ रुपयांनी वाढली आहे. नवी किंमत लागू झाल्यानंतर या सिलेंडरची किंमत १२०४ इतकी झाली आहे. याआधी ऑक्टोबरमध्ये हा सिलेंडर १०८५ रुपयांना मिळत होता.

  

याशिवाय, ५ किलो वजनाचा छोटा सिलेंडर २६४.५० रुपयांना मिळणार आहे. तीनही प्रकारच्या सिलेंडरच्या दरात झालेली वाढ १ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आली आहे. 

lpg

मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ६५१ रुपये, कोलकातामध्ये ७०६ रुपये तर चेन्नईमध्ये ६९५ रुपये इतकी किंमत असणार आहे.