LPG Price : LPG गॅस झाला स्वस्त, जाणून घ्या किती रुपयांना मिळणार सिलिंडर

मुंबईतही सिलिंडरच्या दरात मोठी कपात

Updated: Oct 1, 2022, 10:13 AM IST
LPG Price : LPG गॅस झाला स्वस्त, जाणून घ्या किती रुपयांना मिळणार सिलिंडर

LPG Price : दिवाळीपूर्वीच (diwali) ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवरात्रीमध्ये एलपीजी सिलेंडरच्या (LPG cylinder) दरात कपात करण्यात आली आहे. आज 1 ऑक्टोबरपासून महानगरांमध्ये 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (LPG cylinder) किमती कमी केल्या आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) च्या वेबसाइटनुसार, या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत प्रति युनिट 37.50 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. 

IOCL नुसार, 1 ऑक्टोबरपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत मुंबई 32.5 रुपये, दिल्लीत  25.5 रुपये, कोलकाता 36.5 रुपये, चेन्नईमध्ये 35.5 रुपयांनी कमी असेल. 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर जुन्या किमतीतच उपलब्ध असेल. (LPG Price Today 1 Oct 2022)

सप्टेंबरमध्येही व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. या दर कपातीनंतर हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या व्यावसायिकांच्या खर्चात काहीशी घट होण्याची अपेक्षा आहे. आजपासूनच नवीन दर तात्काळ लागू झाले आहेत.

या सणासुदीच्या काळात सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठा दिलासा दिला आहे. मात्र, हा मोठा दिलासा केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्येच देण्यात आला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

आजपासून मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची  1,811.50 रुपये, दिल्लीत 1,885 रुपयांऐवजी 1,859 रुपये, कोलकातामध्ये 1,995.50 रुपयांऐवजी 1,959 रुपये तर चेन्नईमध्ये 2,009.50 रुपये असेल.

14.2 किलो सिलिंडरचा दर 
कोलकाता 1079
दिल्ली 1053
मुंबई 1052.5
चेन्नई 1068.5