मुंबई : जर तुम्हाला एलपीजी सिलिंडरसारख्या LPG Gas Cylinder ही आवश्यक वस्तूं घर पोच मिळत नसतील किंवा उपलब्ध होत नसतील, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. बऱ्याचदा कंपनींच्या वेगवेगळ्या बदलामुळे ग्राहकांना एलपीजी सिलिंडरचे बुकिंग करायला अडचणी निर्माण होतात. अशा वेळेस तुम्ही टोल फ्री क्रमांकावर 18002333555 वर तक्रार करु शकता किंवा ऑनलाईन तक्रार नोंदवा. सरकारकडून असा दावा केला जात आहे की, तक्रार मिळाल्यानंतर सिलिंडरची डिलिव्हरी त्वरित ग्राहकांना दिली जाईल.
ग्राहक त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी mylpg.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. त्यामध्ये उजवीकडे वरच्या बाजुला तुम्हाला click to giveup LPD subsidy online हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमचा पर्याय दिसेल. त्या पर्यायात तुमची कंपनी निवडा.
नंतर नवीन पेज उघडेल, त्यामध्ये ग्राहक आपला मोबाइल नंबर, एलपीजी आयडी, गॅस एजन्सी इत्यादी माहिती भरतील तेव्हा तक्रारीचा पर्याय उघडेल. आता तुम्ही त्यामध्ये तुमची तक्रार नोंदवू शकता. त्यावर लगेचच योग्य ती कारवाई करुन ग्राहकांच्या तक्रारींच निरसन केले जाईल.