बोर्डाच्या परीक्षेत त्याने लिहिले लव्ह लेटर, पास करण्यासाठी अजब विनंती

उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये सध्या बोर्डाच्या परीक्षांचे पेपर तपासणीचे काम सुरु आहे. मात्र या तपासणीदरम्यान असे काही पेपर समोर येतातय जे पाहून शिक्षकांनाही धक्का बसलाय. पास करण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी तर हद्दच केलीये. काहींनी पास करण्यासाठी पैशांची लाच दिलीये. तर काहींनी शिक्षकांना इमोशनल ब्लॅकमेल केलंय. इतकंच नव्हे तर एका विद्यार्थ्याने या उत्तरपत्रिकेत आपल्या प्रेमाची कहाणीच लिहीलेय. 

Updated: Mar 27, 2018, 12:27 PM IST
बोर्डाच्या परीक्षेत त्याने लिहिले लव्ह लेटर, पास करण्यासाठी अजब विनंती title=

लखनऊ : उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये सध्या बोर्डाच्या परीक्षांचे पेपर तपासणीचे काम सुरु आहे. मात्र या तपासणीदरम्यान असे काही पेपर समोर येतातय जे पाहून शिक्षकांनाही धक्का बसलाय. पास करण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी तर हद्दच केलीये. काहींनी पास करण्यासाठी पैशांची लाच दिलीये. तर काहींनी शिक्षकांना इमोशनल ब्लॅकमेल केलंय. इतकंच नव्हे तर एका विद्यार्थ्याने या उत्तरपत्रिकेत आपल्या प्रेमाची कहाणीच लिहीलेय. 

उत्तरपत्रिकेत लिहिले लव्ह लेटर

मिळालेल्या माहितीनुसार, एका मुलाने तर पास करण्यासाठी उत्तरपत्रिकेत १००-१००च्या नोटा ठेवत लाच देण्याचा प्रयत्न केला. एका विद्यार्थ्याने शिक्षकांना इमोशनल ब्लॅकमेल केलंय. आपल्याला आई नसून मी पास नाही झालो तर वडिल मला मारतील असं त्या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत म्हटलंय. एका विद्यार्थ्याने तर उत्तरपत्रिकेत लव्हलेटरच लिहिलेय.