या रक्षाबंधनाला दिसा अभिनेत्रींप्रमाणे सर्वात सुंदर.. फॉलो करा या ब्युटी टिप्स

   रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन थांबलाय एव्हाना आपली खरेदी झाली असेल किंवा भावांकडून काय काय  गिफ्ट्स घ्यायचेत ती लिस्टसुद्धा बनवून झाली असेल  .. 

Updated: Aug 5, 2022, 02:35 PM IST
या रक्षाबंधनाला दिसा अभिनेत्रींप्रमाणे सर्वात सुंदर.. फॉलो करा या ब्युटी टिप्स  title=

LOOK LIKE CELEBRITY THIS RAKSHABANDHAN:   रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन थांबलाय एव्हाना आपली खरेदी झाली असेल किंवा भावांकडून काय काय  गिफ्ट्स घ्यायचेत ती लिस्टसुद्धा बनवून झाली असेल  .. 
कुठलाही सण असो प्रत्येकीला सुंदर दिसायचं असत  सुंदर तयार व्हायचं असत .पण मग ऐनवेळी  कसं तयार व्हायचं कळत नाही गडबड होते आणि लुक बिघडतो पण यावेळी असं नाही होणार आणि त्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करा आणि अभिनेत्रींप्रमाणे दिसा सर्वात सुंदर..मुख्यतः मेकअप करताना काही बेसिक गोष्टींकडे लक्ष दिलं तर आपण परफेक्ट मेकअप लुक करू शकतो आणि चारचौघात भारी दिसू शकतो . 

क्लिंजिंग 

मेकअप करण्याआधी चेहरा अगदी स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे,यासाठी आपल्या चेहऱ्याच्या टोननुसार क्लींजरची निवड करावी त्यानंतर चेहऱ्यावर एक चांगलं टोनर लावावं .टोनर म्हणून गुलाब पाणी वापरू शकता हे एक उत्तम टोनर आहे 

बेस फाउंडेशन

चेहऱ्यावर टोनर लावल्यानंतर मेकअप करायला सुरवात करा . सुरवात प्रायमर लावण्यापासून करावी. प्रायमर नसेल तर चांगल्या क्वालिटीचं मॉइश्चराईझर लावू शकता यासोबत फौंडेशन लावायला घ्या यासाठी ब्रशचा वापर केव्हाही उत्तम याने फौंडेशन संपूर्ण चेहऱ्यावर लागलं जाईल .  

डोळ्यांचा मेकअप 

जर तुम्ही पहिल्यांदा मेकअप करत आहेत तर सुरवातीला हलक्या रंगाचा आयशॅडो लावू शकता पिंक रंगाचा आय शॅडो कोणत्याही रंगाच्या ड्रेसवर  शोभून दिसतो. हा आयशॅडो लावल्यानंतर काजळ आणि आयलाईनर लावून घ्या. मस्काराचे दोन कोट्स लावून डोळ्यांचा परफेक्ट लुक तुम्ही पूर्ण करू शकता 

लिपस्टिक

चेहऱ्याच्या स्किन टोननुसार  लिपस्टिकची निवड करा,पण ही गोष्ट लक्षात ठेवा डार्क लिपस्टिक लावणार असाल तर मेकअप खूप हलका करा, मुख्यतः आय मेकअपकडे जास्त लक्ष द्या 
अगदी या उलट लाईट शेडची लिपस्टिक लावणार असाल तर आय मेकअप थोडा ब्राईट असेल तरीही चालेल.

ब्लश 

आता गालांवर ब्लश लावायाला विसरू नका पिंक ब्लश ग्लो तुम्हाला उत्तम लुक देईल नाक आणि हनुवटी जवळ हायलाईटर नक्की लावा   

हेयरस्टाइल

सर्वात शेवटी केसांची सुंदर हेअरस्टाईल करा लाईट वेव्ही कर्ली केस असतील तर पोनीटेल सुंदर दिसेल किंवा मेसी बन करून त्यावर गजरा किंवा फुल लावून मस्त दिसू शकता