AMTD Digital IPO: आपल्यापैंकी सगळेच शेअर बाजारात गुंतवणूक करतात परंतु शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापुर्वी शेअर मार्केटची चांगली माहिती असणे आवश्यक असते. बरेचसे लोक कंपनीचे नाव चांगले आहे म्हणून गुंतवणूक करतात कारण त्यांचे असे मत असते की मोठ्या आणि नावाजलेल्या कंपन्या या जास्त नफा कमावतात त्यामुळे त्या कंपनीच्या शेअरमध्ये लोक पैसे गुतंवायला जरासुद्धा मागेपुढे बघत नाहीत पण वास्तविक असे नसते.
अशा अनेक छोट्या कंपन्याही मोठा परतावा देतात. ज्याबद्दल अनेक गुंतवणूकदारांना फार कमी माहिती असते. सध्या अशीच एक कंपनी शेअर मार्केटमध्ये धुमाकूळ घातले आहे. या कंपनीच्या IPO ने अवघ्या 15 दिवसात 32000% रिटर्न दिला आहे. म्हणजे जवळपास कोट्यवधी रूपयांचा रिटर्न दिला आहे. हॉंगकॉंग येथील फिनटेक कंपनी AMTD Digital या कंपनीच्या IPO ने यूएस मार्केटमध्ये 15 दिवसांत 32600 टक्क्यांहून अधिक परतावा दिला.
AMTD Digital चा स्टॉक 15 जुलै रोजी बाजारात लिस्ट झाला होता. त्याच्या IPO ची मूळ किंमत $7.80 per share म्हणजेच इंडियन रूपयानुसार 600 रूपये एवढी होती. 2 ऑगस्टपर्यंत हा शेअर $2555.30 वर पोहोचला त्यानुसार कंपनीच्या शेअरने अवघ्या 15 दिवसांत 32660 टक्के परतावा दिला आहे. यानंतर मात्र या शेअरमध्ये घसरण सुरू झाली. आतापर्यंत हा शेअर मार्केटच्या उच्चांकावरून 96 टक्क्यांनी घसरला आहे आणि $1100 वर आला आहे. 3 ऑगस्टला हा शेअर 30 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.
AMTD Digital बद्दल थोडं काही...
कंपनीने त्यांच्या या IPO मधून $12.5 मिलियन डॉलर जमा केले आहेत. ही कंपनी शेअर मार्केटमध्ये 14व्या क्रमांकवर होती. या कंपनीने walmart, alibaba, toyoto motors, cokacola, bank of america या कंपन्यांनाही मागे टाकले आहे.