PM Modi Speech : 'सुरक्षा न घेता, बुलेटप्रुफ जॅकेट न घालता येईन...' काश्मिर यात्रेवरुन पीएम मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

PM Modi Speech in Lok Sabha : लोकसभेत पावणेदोन तासांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचारापासून काश्मिरपर्यंत सर्वच मुद्द्यावर काँग्रेसवर हल्लाबोल केला

Updated: Feb 8, 2023, 06:53 PM IST
PM Modi Speech : 'सुरक्षा न घेता, बुलेटप्रुफ जॅकेट न घालता येईन...' काश्मिर यात्रेवरुन पीएम मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल title=

PM Modi Speech in Loksabha : राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्लाबोल केला. 2004 ते 2014 काँग्रेसच्या काळात देशाचं वाटोळ झालं. 2014च्या आधीचं दशक 'लॉस्ट डिकेड होतं. मात्र  2014 नंतरचं दशक 'इंडिया डिकेड म्हणून ओळखलं जाईल अस म्हणत त्यांनी काँग्रेसला जोरदार टेला लगावला. आपण संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचलंय. याउलट घोटाळ्यांमुळे काँग्रेस आणि यूपीएची प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे भविष्यात जगभरात काँग्रेसच्या बरबादीचा अभ्यास होऊ शकतं असंही मोदी म्हणाले.

'जम्मूतली परिस्थिती बदलली आहे'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी लोकसभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. काही जण आताच जम्मू-काश्मिर (Jammu-Kashmir) फिरून आले आहेत, त्यांनी पाहिलं असेल किती बिनधास्तपणे आता जम्मू-काश्मिरमध्ये फिरता येतं, असं सांगत भारत जोडो यात्रा करणाऱ्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना टोला लगावला. काही वर्षांपूर्वी आपणही जम्मू-काश्मिरमध्ये यात्रा घेऊन गेलो होतो, लाल चौकात तिरंगा फडकवण्याचा संकल्प केला होता, तेव्हा दहशतवाद्यांनी पोस्टर लावले होते, त्यात लाल चौकात येऊन तिरंगा फडकवण्याची हिंमत कोणात आहे ते पाहूया असा इशारा दहशतवाद्यांनी दिला होता. 

दहशतवाद्यांना दिलं होतं आव्हान
त्यावेळी आपण दहशतवाद्यांना आव्हान दिलं होतं, 26 जानेवारीला बरोबर 11 वाजता, मी लाल चौकात सुरक्षा न घेता येईन, बुलेट प्रुफ जॅकेट न घालत येईन फैसला तिथेच होईल असं मी त्यांना सुनावलं होतं. त्यानंतर लाल चौकात आम्ही तिरंगा फडकाऊन दाखवला. त्यावेळी अशी परिस्थिती होती. आता परिस्थिती बदलली आहे. आता तुम्ही कोणतीही भीती न बाळगता जम्मू-काश्मीरमध्ये जाऊ शकता, असं सांगत पीएम मोदी यांनी गेल्या नऊ वर्षात परिस्थिती किती बदलली याचा दाखला दिला.

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आता जम्मू-काश्मिरमध्ये पर्यटनाचे सर्व रेकॉर्ड मोडले गेले आहेत, आज जम्मू-काश्मिरमध्ये लोकतंत्राचा उत्सव साजरा केला जातोय, आज जम्मू-काश्मिरमध्येही हर घर तिरंगाचा कार्यक्रम साजरा केला जातो. जम्मू-काश्मिरमध्ये तिरंगा फडकावल्याने शांती भंग होईल असा आरोप काही जणांकडून केला जात होता, आता तिच लोकं तिरंगा यात्रेत सहभागी होतात, असा टोला पीएम मोदींनी लगावला.