LokSabha Nivadnuk Nikal 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर, काँग्रेसचे अजय राय यांनी घेतली आघाडी

LokSabha Nivadnuk Nikal 2024: वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर असून काँग्रेसचे अजय राय यांनी आघाडी घेतली आहे.  

शिवराज यादव | Updated: Jun 4, 2024, 09:50 AM IST
LokSabha Nivadnuk Nikal 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर, काँग्रेसचे अजय राय यांनी घेतली आघाडी title=

LokSabha Nivadnuk Nikal 2024: लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीए आणि इंडिया आघाडीत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. एनडीएला बहुमत पार करताना थोडी कसरत करावी लागत असल्याचं दिसत आहे. दरम्यान वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर असून काँग्रेसचे अजय राय यांनी आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी वायनाडमधून आघाडी घेतली आहे. तसंच भाजपाच्या स्मृती इराणी अमेठीतून पिछाडीवर आहेत. 

कलांमध्ये आघाडीचा आलेख बदलण्यास सुरुवात झाली आहे. इंडिया आघाडीकडे आता कल दिसून येत असून, एनडीएकडे 280 जागांवर आघाडी पाहायला मिळत आहे. तर, इंडिया आघाडीने 187 जागांवर सरशी मिळवल्याचं पाहायला मिळत आहे.