शिवपूरी : मध्य प्रदेशच्या गुना मतदार संघातून गेल्या चारवेळा विजयी झालेले काँग्रेस महासचिव आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादीत्य सिंधिया यांनी आपले दु:ख व्यक्त केले आहे. खूप विकास कार्य केले तरीही गुना शहर आणि शिवपुरी शहर विधानसभा क्षेत्रातून हारच मिळते. माझ्याकडून काही होत आहे का असा प्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांना केला. सिंधिया रविवारी शिवपूरी विधानसभा मतदार संघात पार्टी कार्यकर्त्यांसमोर आपले दु:ख व्यक्त करत होते.
या संसदीय क्षेत्रात येणारे अशोकनगर, शिवपुरी आणि गुना जिल्ह्याच्या सर्व विधानसभा क्षेत्रातून पार्टीने हजारो मतांनी विजय मिळवला आहे. पण गुना शहर आणि शिवपूरी विधानसभा जागेवर आपण हरतो. या दोन विधानसभा क्षेत्रात हार पत्करावी लागते याचे कारण काय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जर माझी काय चूक असेल, माझ्यात काही कमी असेल तर मी सुधारायला तयार आहे असे आवाहन सिंधिया यांनी कार्यकर्त्यांना केले. गुना संसदीय क्षेत्रात सिंधिया परिवाराची परंपरागत सीट आहे. इथे ज्योतिरादित्य सिंधिया यांची आजी विजयाराजे सिंधिया पाचवेळा जिंकल्या. त्यांचे वडील माधवराव सिंधिया चार वेळा जिंकले. तर ज्योतिरादित्य सिंधिया 2002 पासून चार वेळा जिंकले आहेत.