पाहा Video : सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात खडाजंगी, सोनिया गांधी म्हणाल्या Don't Talk to Me

अधीर रंजन यांच्या वक्तव्यावरून संसदेत सोनिया गांधी आणि स्मृती इराणी समोरासमोर  

Updated: Jul 28, 2022, 05:58 PM IST
पाहा Video : सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात खडाजंगी, सोनिया गांधी म्हणाल्या Don't Talk to Me title=

Adhir Ranjan Controversial Remark: काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गुरुवारी संसदेत गदारोळ झाला. गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. सभागृह तहकूब केल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smruti Irani) यांच्यात सभागृहाबाहेर जोरदार वादावादी झाली.

लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर भाजप खासदार 'सोनिया गांधी माफी मागा'च्या घोषणा देत होते. 12 वाजता सभागृहाचं कामकाज सुरू होताच ही घोषणाबाजी करण्यात आली. गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब झालं. त्यानंतर सोनिया गांधी यांनी घोषणाबाजीतच भाजप खासदार रमा देवी यांच्याकडे जात अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितल्याचं सांगितलं.

त्याचवेळी रमा देवीजवळ उभ्या असलेल्या स्मृती इराणी यांनी सोनिया गांधी यांना उद्देशून वक्तव्य केलं. यावेळी सोनिया गांधी संतापल्या आणि त्यांनी स्मृती इराणी यांना तूम्ही माझ्याशी बोलू नका ( Don't Talk to Me) असं सांगितलं. यावरुन स्मृती इराणी आणि सोनिया गांधी यांच्यात जोरदार वादावादी झाली. तब्बल 2 ते 3 मिनिटं हा वाद सुरु होता. खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला आणि सोनिया गांधी यांना घेऊन गेल्या.

त्याआधी स्मृती इरामी यांनी लोकसभेत बोलताना सोनिया गांधी यांच्यावर आरोप केला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अपमानाला सोनिया गांधी यांनी मंजुरी दिली असा आरोप स्मृती इराणी यांनी केला.