Viksit Bharat Whatsapp Message : देशात गेल्या काही दिवसांपासून लोकांच्या मोबाईलवर एक WhatsApp मेसेज पाठवला जात आहे. 'विकसित भारत संपर्क' नावाच्या ग्रुपमध्ये लोकांना आपोआप जोडलं जात आहे. यावर निवडणूक आयोगाने (Election Commission) मोठा निर्णय घेत आहे. निवडणूक आयोगने केंद्र सरकारला (Central Government) विकसित भारत संपर्कचे मेसेज व्हॉट्सअॅपवर पाठवणं ताबडतोब बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. 'विकसित भारत संपर्क'चा उद्देश सरकारचा प्रचार करण्याचा असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय. काँग्रेसने याबाबत काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली होती. यामध्ये 'प्यारे परिवार जन' या नावाने पंतप्रधानांचा संदेश लोकांच्या व्हॉट्सॲपवर पाठवला जात होता. काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्याने देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशभरातील लोकांच्या मोबाईलवर WhatsApp मेसेज पाठवला जात आहे. विकसित भारत संपर्कच्या नावाने येणार हा मेसेज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार करणार आहे, असा आक्षेप निवडणूक आयोगाने नोंदवला. त्यानंतर निवणडणूक आयोगाने मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीला (MeitY) हे मेसेज तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले.
16मार्चला केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. ज्या दिवशी घोषणा झाली त्याच दिवशी देशात आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे एखाद्या पक्षाचा किंवा नेत्याचा प्रचार होईल असे मेसेज टाकण्यास मनाई असते. त्यामुळे निवडणूक आयोगाने MeitY ला मेसेज बंद करण्याचे निर्देश दिले. यावर MeitYने उत्तर दिलं आहे. हे मेसेज लोकसभा निवडणुची तारखी जाहीर होण्याआधी पाठवण्यात आले होते. काही लोकांना ते आता मिळत आहेत, असं MeitYने म्हटलंय. नेटवर्क समस्येमुळे कदाचित हे मेसेज लोकांना उशीराने मिळल्याचं MeitY ने उत्तर दिलं आहे.
काय आहे 'विकसित भारत संपर्क' मेसेजमध्ये
'हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने पाठवले आहे. गेल्या एका वर्षात सर्व 140 कोटी लोकांना सरकारच्या विविध योजना आणि धोरणांचा लाभ झाला आहे आणि भविष्यातही लाभ मिळत राहील. यात तुमचा सहभाग महत्वाचा आहे. कारण आम्ही "एक कुटुंब म्हणून एकत्र आहोत, आम्ही विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने काम करत आहोत. कृपया विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचा अभिप्राय आणि सूचना शेअर करा' असं या मेसेजमध्ये लिहिण्यात आलं होतं.