No Confidence Motion Reject : सभागृहात मोदी सरकारविरोधातला अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आहे. आवाजी मतदानाने अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आला. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी सभात्याग केला. अविश्वास प्रस्तावाच्या (NO Confidence Motion) चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस (Congress) आणि विरोधकांच्या इंडिया (I.N.D.I.A) आघाडीवर जोरदार टीका केली. यूपीएपासून इंडियापर्यंत त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. मात्र त्यांच्या मुख्य टीकेचा रोख हा गांधी परिवार होता.
अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन
काँग्रस नेते अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरींचे देखील निलंबन करण्यात आलंय. मोदी हे नीरव मोदी बनून देशात राहत असल्याचं विधान त्यांनी केलं. त्यामुळे भाजपच्या खासदारांनी मोठा गोंधळ घातला. अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे लोकसभेत मोठा गदारोळ झाला. मोदी हे नीरव मोदी बनून देशात राहत असल्याचं विधान त्यांनी केलं. त्यामुळे भाजपच्या खासदारांनी मोठा गोंधळ घातला. तसंच अधीर रंजन यांनी माफी मागावी अशी मागणी केली. तर विरोधकांना चर्चा नको तर गोंधळ हवा असल्याची टीका केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली.
मोदींचा मॅरेथॉन भाषण
लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेत पंतप्रधान मोदी यांनी भाषण केली. त्यांनी तब्बल 2 तास 13 मिनिटं भाषण केलं. अविश्वास प्रस्तावावरचं आतापर्यंतच हे सर्वात मोठं भाषण होतं. आपल्या भाषणात पीएम मोदींनी काँग्रेस, राहुल गांधी आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. भाषणाच्या शेवटी पीएम मोदी यांनी मणिपूर हिंसाचारवर भाष्य केलं. त्याआधी विरोधकांनी गोंधळ घालत सभात्याग केला.
विरोधकांवर निशाणा
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात विरोधकांना टोला लगावला. विरोधकांनी अविश्वास प्रस्तावावर (No Confidence Motion) नीट चर्चा केली नाही. विरोधकांनी फिल्डिंग लावली, सरकारने चौकार-षटकार मारले पण अविश्वास प्रस्तावावर विरोधक नो-बॉल-नो-बॉल करत राहिले. सरकारकडून शतके रचली जात होती. त्यामुळे मी विरोधी पक्षांना सांगू इच्छितो की, जरा मेहनत घेऊन येत या. तुम्हाला 2018 मध्ये सांगितलं होतं की जरा जास्त मेहनत करुन या, पण पाच वर्षातही काहीही बदलले नाही असा टोला पीएम मोदी यांनी विरोधकांना लगावला. देशातील जनतेने वारंवार आमच्या सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. यासाठी देशातील जनतेचे आभार. देव खूप दयाळू आहे असे म्हणतात. देवाने विरोधकांना अविश्वास प्रस्ताव आणण्याची सूचना केली हा मी देवाचा आशीर्वाद मानतो. 2018 मध्येही विरोधकांनी तसा प्रस्ताव आणला हा देवाचा आदेश होता. अविश्वास ठराव ही आमच्या सरकारची फ्लोअर टेस्ट नाही, तर ती विरोधकांची फ्लोअर टेस्ट आहे. एक प्रकारे विरोधकांचा अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभ आहे असंही मोदी यांनी म्हटलंय.