अजब-गजब : ११०७ करोडोंच्या संपत्तीच्या मालकाला केवळ ११०७ मतं

या मतदारसंघात भाजपाकडून राम कृपाल यादव तर आरजेडीकडून मीसा भारती यांना रमेश शर्मा टक्कर देत होते

Updated: May 23, 2019, 07:18 PM IST
अजब-गजब : ११०७ करोडोंच्या संपत्तीच्या मालकाला केवळ ११०७ मतं title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ निकाल आता जवळपास स्पष्ट झालेत. या निकालांत भाजपा देशातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय. २०१९ च्या निकालांत भाजपनं आपलाच २०१४ चा रेकॉर्ड तोडत बहुमताचा मोठा आकडा गाठलाय. परंतु, या दरम्यान आणखी एका अपक्ष उमेदवाराची मोठी चर्चा आहे. हे उमेदवारी म्हणजे बिहारच्या पाटलीपुत्र मतदार संघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे रमेश कुमार शर्मा...

रमेश कुमार शर्मा याआधी चर्चेत आले ते त्यांच्या संपत्तीमुळे... २०१९ च्या निवडणुकीतील रमेश शर्मा हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले होते. अर्ज दाखल करताना रमेश शर्मा यांनी आपल्या संपत्तीचा उल्लेख करत आपली तब्बल ११०७ करोड रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. उल्लेखनीय म्हणजे, लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये रमेश शर्मा यांना केवळ ११०७ मतं मिळालीत. 

या मतदारसंघात भाजपाकडून राम कृपाल यादव तर आरजेडीकडून मीसा भारती यांना रमेश शर्मा टक्कर देत होते. मतमोजणीत या मतदारसंघात राम कृपाल यादव प्रथम क्रमांकावर तर मीसा भारती दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

कोण आहेत रमेश शर्मा

रमेश शर्मा हे चार्टर्ड इंजिनिअर पदवीधारक आहेत. त्यांच्याकडे नऊ वाहने आहेत. यामध्ये फॉक्सवॅगन जेट्टा, होंडा सिटी आणि ओप्टा शेवरले या गाड्यांचाही समावेश आहे. शर्मा यांची एकूण संपत्ती ११,०७,५८,३३,१९० रुपये आहे. यातील ७,०८,३३,१९० रुपये चल संपत्ती आहे.