Lok Sabha Elections 2024 : तुम्ही अजूनही मतदान कार्ड काढलं नाही? पाहा कसा करायचा अर्ज?

How to apply For Voter ID : लोकसभा निवडणुकीचं शंखनाद झाल्यानंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मतदान करण्यासाठी आणि देशाच्या भविष्याला हारभार लावण्यासाठी तरुणांनी मतदान कार्ड काढणं आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने अॅप्लाय कसं करायचं? पाहा

सौरभ तळेकर | Updated: Mar 16, 2024, 05:43 PM IST
Lok Sabha Elections 2024 : तुम्ही अजूनही मतदान कार्ड काढलं नाही? पाहा कसा करायचा अर्ज?  title=
Lok Sabha Elections 2024 How to apply for Voter ID

Lok Sabha Elections dates 2024 announced : केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी आज 18 व्या लोकसभा निवडणूकीची (Lok Sabha Elections 2024) घोषणा केली आहे. 19 एप्रिलपासून मतदानाचा पहिला टप्पा सुरू केला असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. देशातील 97.8 कोटी मतदारांपैकी 49.7  कोटी पुरुष तर 47.1 कोटी महिला मतदानाचा हक्क बजावतील. तर, 48 हजार तृतीयपंथी मतदानाचा हक्क बजावतील. तर 1.82 कोटी नवीन मतदार म्हणजेच 18 ते 20 वर्षांचे पात्र तरुण मतदार असणार आहेत. त्यामुळे देशाची आगामी दिशा ठरवण्यासाठी तरुणांचा सहभाग देखील महत्त्वाचा ठरेल. अशातच काही तरुणांनी अद्याप वोटिंग आयडी (Voter ID) काढलेलं नाही. वोटिंग कार्ड काढण्यासाठी अर्ज कसा करायचा? त्याला कोणते डॉक्यूमेंट लागतील? संपूर्ण माहिती जाणून घ्या.

मतदान कार्डासाठी अर्ज कसा कराल?

नवीन नोंदणीसाठी, तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर फॉर्म 6 भरणं आवश्यक आहे.  voters.eci.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करता येईल. तर ज्यांना मतदान कार्डमध्ये दुरुस्ती करायची आहे, त्यांना फॉर्म 8 भरावं लागेल. पासपोर्ट आकाराचा फोटो, ओळखीचा पुरावा, पत्ता पुरावा, जन्मतारीख पुरावा ईत्यादी डॉक्युमेंट तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे. लॉगिन केल्यानंतर अकाऊंट ओपन करा, त्यानंतर फॉर्म 6 भरा आणि सर्व आवश्यक तपशीलांसह कागदपत्रे आणि फोटो अपलोड करा.  सर्व तपशील भरल्यानंतर तुम्ही अर्ड सबमिट करा. त्यानंतर मतदान अर्ज आयोगाकडे जाईल. तुम्ही त्यानंतर वोटिंग कार्डटला ट्रॅक देखील करू शकता.

https://www.nvsp.in/ किंवा https://voters.eci.gov.in/ या राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP) च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही वोटिंग कार्डटचं अॅप्लिकेशन ट्रॅक करु शकता. ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करून आयडी क्रमांक टाकल्यानंतर ट्रॅक स्टेट्सवर तुम्हाला तुमचं ओळखपत्र दिसेल. आयोगाने मान्यता दिल्यानंतर तुमच्या घरी पोस्टाने कार्ड येईल. 

दरम्यान, ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर तुम्ही जवळच्या निवडणूक नोंदणी कार्यालयाला भेट देऊन अर्ज करु शकता. त्यावेळी तुमच्यासोबत वरील कागदपत्रे असणं आवश्यक आहे. फोनद्वारे तुमच्या मतदार ओळखपत्राच्या अर्जाच्या स्थितीबद्दल चौकशी करण्यासाठी, तुम्ही टोल-फ्री नंबर 1950 डायल करू शकता. 

राज्यातील निवडणुकीच्या तारखा

पहिला टप्पा - रामटेक, नागपूर, भंडारा, गरचिरोली, चंद्रपूर (मतदान तारीख – 19 एप्रिल )
दुसरा टप्पा - बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी (मतदान तारीख – 26 एप्रिल)
तिसरा टप्पा - रायगड, बारामती, उस्मानबाद, लातूर, सोलापर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, हातकणंगले (मतदान तारीख – 7 मे )
चौथा टप्पा - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड (मतदान तारीख – 13 मे )
पाचवा टप्पा - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (मतदान तारीख – 20 मे)