काँग्रेसकडून नवजोत कौर सिद्धू यांना उमेदवारी नाही

मी पक्षाने केलेल्या निर्णयाचा आदर करते. 

Updated: Apr 3, 2019, 07:11 PM IST
काँग्रेसकडून नवजोत कौर सिद्धू यांना उमेदवारी नाही title=

चंडीगढ : लोकसभा निवडणूक २०१९ साठी राजकीय पक्षांकडून सतत उमेदवारांच्या नावांची घोषणा सुरू आहे. उमेदवारांच्या घोषणेदरम्यान अनेक मोठ्या नेत्यांचे लोकसभेचे तिकीट कापण्यात आले. काँग्रेसकडून चंडीगढमधून माजी केंद्रीय मंत्री पवन कुमार बंसल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बंसल यांना तिकीट मिळाल्यामुळे पूर्व आमदार नवजोत कौर सिद्धू यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्याआधीच नवजोत कौर सिद्धू यांनी जनसभा सुरू केल्या होत्या. नवजोत कौर सिद्धू पंजाब सरकारमधील मंत्री आणि माजी क्रिकेटर नवजोत सिंग सिद्धू यांच्या पत्नी आहेत.

'पवन कुमार बंसल एक वरिष्ठ नेता आहेत. मी पक्षाने केलेल्या निर्णयाचा आदर करते. मी बंसल यांना जिंकवण्यासाठी काम करेन. मला युवकांसाठी काम करायचे आहे.' असे नवजोत कौर सिद्धू यांनी म्हटले आहे. काँग्रेसकडून नवजोत कौर सिद्धू यांना भटिंडा किंवा संगरूर संसदीय क्षेत्रातून तिकीट देण्यात येत होते परंतु मी तेथून निवडणूक लढवण्यास नकार दिला. माझे घर अमृतसर आणि चंडीगढ आहे. मी कोणत्याही दुसऱ्या जागेवरून निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

नवजोत कौर यांनी काँग्रेसचा गढ मानल्या जाणाऱ्या माजी पूर्व केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांच्या चंडीगढ लोकसभेच्या जागेसाठी निवडणूक लढवण्यासाठी आपला अर्ज दाखल केला होता. या जागेवर २०१४ मध्ये भाजपा उमेदावार किरण खेर यांचा विजय झाला होता.