दिल्लीत पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

दिल्लीकरांना उन्हापासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

Updated: Apr 3, 2019, 07:12 PM IST
दिल्लीत पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज title=

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये तापमानाचा पार चांगलाच वाढला आहे. उन्हाच्या झळांनी दिल्लीतील नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. परंतु ५ एप्रिल रोजी दिल्लीकरांना उन्हापासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि आसपासच्या परिसरात वारे वाहण्याची आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीतील लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ६, ७, ८ आणि ९ एप्रिल रोजी दिल्लीत मळभ येईल. आभाळ भरलेले राहील. सोसाटयाचा वारा येण्याचीही शक्यता असून हलक्या स्वरूपातील पाऊस होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाच्या झळा वाढल्या असून तापमानाच्या पारा कमाल तापमानाचा आकडा ३७ अंश सेल्सियसच्यावर पोहचला आहे. किमान तापमान १७ अंश सेल्सियसच्यावर नोंदवण्यात आले आहे. 

delhi

दिल्लीतील तापमानाचा कोणताही परिणाम मुंबईत होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली नाही.