नवी दिल्ली : समाजवादी पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. यात तीन महिलांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. जागतिक महिला दिनानिमित्ताने ही यादी घोषित केली. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी याबाबत ट्विट केले असून महिलांसाठी ही यादी समर्पित केली आहे. अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादवर पुन्हा एकदा कन्नौजमधून लोकसभा निवडणूक लढवत आहे. या जागेवरुन त्या लोकसभा सदस्य आहेत. तसेच लखीमपूर खिरीतून सपाचे राज्यसभेचे खासदार रवी वर्मा यांची मुलगी पूर्वी वर्मा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. हरदोई ही जागा एकदम सुरक्षित आहे. याठिकाणाहून ऊषा वर्मा यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.
Samajwadi Party releases another list of three candidates for Lok Sabha elections 2019. Dimple Yadav to contest from Kannauj, Usha Verma from Hardoi and Poorvi Verma from Lakhimpur Kheri pic.twitter.com/bQ0Op4qymA
— ANI UP (@ANINewsUP) March 8, 2019
याआधी लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने पहिल्या यादीत सहा जणांना उमेदवारी दिली आहे. आतापर्यंत, समाजवादी पार्टीने आपले नऊ उमेदवार घोषित केले आहेत. पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांना मैनपूरीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते आझमगड येथून खासदार आहे. 2014 ला ते दोन्ही जागांवरुन निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी मैनपूरीची जागा सोडून दिली होती. मुलायम व्यतिरिक्त, बादायुचे धर्मेंद्र यादव सपाचे उमेदवार असतील. मोदींच्या लाटे असूनही अखिलेश यादव यांच्या जवळ असलेले धर्मेंद्र यादव 2014 च्या निवडणुकीत विजयी झाले होते. पुन्हा एकदा सपाने त्यांना याच जागेची उमेदवारी दिली आहे. त्याचप्रमाणे फिरोजाबादचे माजी खासदार अक्षय यादव यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय बहराइचमधील शबीर बाल्मीकी, रॉबर्ट्सगंजमधून भाईलाल कोल आणि इटावा येथून कमलेश कॅठेरिया यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन मिळाले आहे.