Lockdown : आणखी एका राज्यात 14 दिवसांचा लॉकडाऊन

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आणखी एका राज्यात लॉकडाऊन

Updated: Apr 26, 2021, 04:30 PM IST
Lockdown : आणखी एका राज्यात 14 दिवसांचा लॉकडाऊन title=

बंगळुरु : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरातील लोकांच्या चिंता वाढल्या असताना आता आणखी एका राज्यात 2 आठवड्यांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना सूट देण्यात आली आहे. राज्यात लॉकडाऊन सारखे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी म्हटलं की, राज्यात उद्या रात्री 9 वाजेपासून 14 दिवसांचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना बाहेर पडता येणार आहे. सकाळी 10 नंतर दुकानं बंद राहतील. फक्त बांधकाम आणि कृषि क्षेत्रातील कामांना परवानगी असेल. सार्वजनिक वाहतूक बंद राहणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी अधिकाऱ्यांना या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. जेथे कर्फ्यू लागू आहे ते कायम राहिल. 

कोरोना संकटामुळे कर्नाटकमध्ये ही परिस्थिती बिकट होत आहे. दररोज 10 हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. कर्नाटकमध्ये सध्या 2.62 लाख अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.

देशात कोरोना व्हायरसचा वेग अधिक वाढत आहे. मागील 5 दिवसांपासून रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. पाच दिवसात दररोज 3 लाखाहून अधिक रुग्ण वाढत आहेत. याआधी महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.