पोलिसांनी रोखले तरी मी घाबरणार नाही-प्रियंका गांधी

नाराज झालेल्या प्रियंका आपल्या समर्थकांसह जागेवरच आंदोलनास बसल्या

Updated: Jul 19, 2019, 12:54 PM IST
पोलिसांनी रोखले तरी मी घाबरणार नाही-प्रियंका गांधी title=

नवी दिल्ली : सोनभद्रमध्ये झालेल्या वादामध्ये १० जणांना गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. या हत्याकांडानंतर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी या घटनेतील पिडितांना भेटण्यास निघाल्या. पण पोलिसांनी त्यांना मिर्झापूर आणि वाराणसीच्या सीमेवरच रोखले. यामुळे नाराज झालेल्या प्रियंका आपल्या समर्थकांसह जागेवरच आंदोलनास बसल्या. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलीस आम्हाला कुठे घेऊन जातायत ते माहित नाही. पण सोनभद्र जमीन वादात दहा जणांची हत्या झाल्याचे प्रियंका गांधी म्हणाल्या. 

प्रशासन मला पिडितांना भेटण्यापासून रोखत आहे. योगी सरकार काहीही करो पण आम्ही झुकणार नाही. आम्हाला केवळ सोनभद्र जाऊन पिडितांच्या परिवाराची भेट घ्यायची आहे. मी केवळ ४ जणांना माझ्यासोबत नेण्याबद्दल प्रशासनाला सांगितले. पण प्रशासन तिथे जाण्यापासूनच आम्हाला रोखत आहे. आम्हाला का रोखलं जातंय ? याबद्दल प्रशासनाला उत्तर द्यावेच लागेल असे त्या म्हणाल्या.