LinkedIn वर नोकरी शोधताय? बातमी वाचा नाहीतर येईल पश्चातापाची वेळ

LinkedIn Job News : गेल्या काही काळापासून मोठा नोकरदार वर्ग नोकरीच्या शोधार्थ LinkedIn ची मदत घेताना दिसतो. इथं एकाच ठिकाणी अनेक पर्याय या वर्गासाठी उपलब्ध असतात.   

Updated: Feb 28, 2023, 12:55 PM IST
LinkedIn वर नोकरी शोधताय? बातमी वाचा नाहीतर येईल पश्चातापाची वेळ  title=
LinkedIn people getting conned job scam latest Marathi news

LinkedIn Scam : जगभरात आर्थिक मंदीची (Recession) लाट आलेली असतानाच आता असंख्यजण नव्या (Job News) नोकरीच्या शोधात आहेत. पगारवाढ नाही, सुविधा नाहीत या आणि अशा अनेक कारणांसाठी सध्या मोठ्या संख्येनं नोकरी बदलण्याच्या तयारीत दिसत आहेत. पण, याचा गैरफायदा घेत काही टोळ्याही सक्रीय झाल्या आहेत ज्यांच्याकडून या मंडळींनी फसवणूक करण्याचं सत्र सुरु आहे. 

लिंक्डइन (LinkedIn Jobs) सध्या या विळख्यात आलं असून, इथं ज्या नोकऱ्या अस्तित्वातच नाहीत त्यासंबंधीच्या जाहिराती देत अनेकांनाच फसवण्यात येत आहे. (Microsoft) मायक्रोसॉफ्टची मालकी असणाऱ्या या प्लॅटफॉर्मवर अनेक संस्थांच्या नावे फसवी नोकरभरती प्रक्रिया सुरु असल्याचा खळबळजनक खुलासा नुकताच झाला आहे. 

लिंक्डइनचे प्रोडक्ट मॅनेजमेंट उपाध्यक्ष ऑस्कर रोड्रिग्ज यांनी एका अहवालाला दुजोरा देत सदरील प्रकरणं आणि घोटाळ्यांमध्ये वाढ झाल्याची माहिती दिली. हल्लीच या प्लॅटफॉर्मवर लाखो बनावट खाती ब्लॉक करण्याची मागणीही जोर धरत असून, त्या दृष्टीनं पावलं उचलली जात आहेत. 

तुम्हीही या विळख्यात अडकला आहात? 

सायबर सुरक्षा हाताळणाऱ्या जेडस्केलर या कंपनीकडून नुकतंच या भयंकर घोटाळ्याविषयीचं वर्णनही करण्यात आलं. जिथं नोकरी शोधणाऱ्यांना निशाण्यावर घेतलं जातं असा खुलासा झाला. इथं लिंक्डइनच्या डिरेक्ट मेसेजिंग फिचरच्या माध्यमातून लोकांना मेलच्या माध्यामातून संपर्क साधला जातो. अनेक फसव्या कंपन्यांकडून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांच्या खासगी माहितीशीही तडजोड केली गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

हेसुद्धा वाचा : Exit Poll 2023: जनमत कुणाला, पूर्वोत्तर भारत कुणाचा? काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे 

दरम्यान, ज्या एआय (AI)चा वापर करत अनेक गोष्टी सुकर होतील असा अंदाज होता तो मात्र आता निरर्थक ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, याच एआयचा वापर करत आता लिंक्डइनवर ही फसवेगिरी सुरु आहे. अमेरिकन संघ व्यापार आयोगानं हल्लीच दिलेल्या माहितीनुसार 2022 मध्ये नोकरी आणि व्यापारासंदर्भातील घोटाळ्यांची 92000 हून अधिक प्रकरणं समोर आली. ज्यामध्ये 367.4 मिलियन डॉलर इतकी रक्कम बुडाल्याची माहिती समोर आली. त्यामुळं तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल आणि अशा एखाद्या अॅपचा वापर करत असाल, तर कोणत्याही सिस्टीम जनरेटेड मेलला उत्तर देण्यापूर्वी सावध व्हा!