मुंबई : जर तुम्ही जनधन खातेधारक असाल तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. जनधन खातेधारकांसाठी सरकारने आदेश जारी केले आहे. आदेशाचं पालन न केल्यास तुम्हाला 1 लाख 30 हजार रुपयांचे नुकसान होऊ शकते. यासाठी तुम्हाला आपले जन-धन खाते आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे.
असे मिळतील 1.30 लाख रुपये
सरकारच्या विशेष योजनांमध्ये जन-धन योजनेच्या खातेधारकांना 1 लाख रुपयांचा एक्सिडेंटल विमासुद्धा मिळू शकतो. परंतु जर खातेधारकाचे खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर या विम्याचा तुम्हाला फायदा होणार नाही.
म्हणजेच या विम्यासंदर्भात तुमचे 1 लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते. याशिवाय खातेधारकारकाला 30 हजार रुपयांचा अपघाती विमा मिळतो. जर आधार कार्ड लिंक नसेल तर हा फायदा देखील खातेधारकाला मिळू शकत नाही.
खात्याला आधारशी करा लिंक
1 तुम्ही बँकेत जाऊन आधारला लिंक करू शकता
2 यासाठी आधारकार्डची एक फोटो कॉपी अन् तुमचे पासबुक घेऊन जा.
3 अनेक बँका मॅसेजच्या माध्यमातूनच आधार लिंक करण्याची सुविधा देत आहेत
4 जवळच्या एटीएम(ATM)च्या माध्यमातूनही बँक खात्याला लिंक करता येते
हे कागदपत्र ठेवा सोबत
यासाठी तुमच्याकडे काही महत्वाचे कागदपत्र असणे आवश्यक आहे. आधारकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, पॅन कार्ड, वोटर कार्ड इत्यादी