LIC New Rules 2021: नवी दिल्ली : भारतीय जीवन विमा महामंडळाने ( LIC ) शुक्रवारी काही नियमांमध्ये बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार LIC प्रत्येक शनिवारी सुटी घेणार आहे. या दिवशी LIC च्या सर्व शाखा बंद असणार आहेत. या दिवशी LIC कोणतेही काम करणार नाही. सर्व खातेदारांना आपली कामे सोमवार ते शुक्रवार दरम्यान पूर्ण करणे आवश्यक असणार आहे.
केंद्र सरकारने निगोशिएबल इंस्ट्रुमेंट ऍक्ट 1881 सेक्शन 25 नुसार हे बदल केले आहेत. या बदलाचा LIC च्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
LIC च्या या निर्णयाचा कर्मचाऱ्यांमध्ये आनंद आहे. महामंडळाने त्यांच्यासाठी एकप्रकारे गिफ्ट दिले आहे. याबाबतीत व्यवस्थापनाच्या अंतिम प्रस्तावाला केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले आहे. अर्थ मंत्रालय याबाबतीत अधिसूचना काढून बदल करू शकते