LIC पॉलिसी घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; मिळतील पूर्ण 10 लाख रुपये, अधिक जाणून घ्या

 LIC Policy News: एलआयसीची पॉलिसी अनेकजण घेतात. मात्र, पूर्ण रक्कम मिळण्याबाबत माहिती नसते. एलआयसीची पूर्ण रक्कम मिळण्यासाठी अर्ज करा करायचे ते जाणून घ्या. 

Updated: Jan 6, 2023, 12:04 PM IST
LIC पॉलिसी घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; मिळतील पूर्ण 10 लाख रुपये, अधिक जाणून घ्या title=
LIC News in Marathi

LIC Policy: LIC पॉलिसी घेण्याचा विचार करत आहात का? अनेक जण विमा उतरवतात. काही जण एलआयसीला (LIC Policy Latest News) प्राधान्य देत असतात. आजच्या काळात त्याची खूप गरजही आहे. तसेच LIC हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्हाला पैसे गुंतवून मॅच्युरिटी कालावधीवर लाखो रुपयांचा निधी मिळतो. आज अशाच एका प्लानबद्दल जाणून घ्या. या प्लानमध्ये तुम्हाला 10 लाख रुपयांच्या पूर्ण लाभासोबत दुप्पट बोनस मिळेल.(LIC News in Marathi)

पॉलिसीमध्ये  मिळेल दुप्पट बोनस 

LIC हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्हाला पैसे गुंतवून मॅच्युरिटी कालावधीवर लाखो रुपयांचा निधी मिळतो. ज्यामध्ये तुम्हाला 80 रुपये गुंतवून 10 लाख रुपये मिळतील. या पॉलिसीचे नाव LIC जीवन आनंद आहे. या पॉलिसीमध्ये ग्राहकांना छोट्या गुंतवणुकीवर मोठा निधी मिळतो. इतर लाभांव्यतिरिक्त, तुम्हाला या पॉलिसीमध्ये दुप्पट बोनस देखील मिळतो. 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती ही पॉलिसी घेऊ शकते.

LIC जीवन आनंदमध्ये 80 रुपये प्रीमियम म्हणून भरावे लागतील. या पॉलिसीमध्ये तुम्हाला प्रीमियम म्हणून वार्षिक 27,000 रुपये भरावे लागतील. म्हणजेच, तुम्हाला दरमहा सुमारे 2300 रुपये आणि दररोज सुमारे 80 रुपये प्रीमियम भरावा लागेल. 

वयाच्या 21 व्या वर्षी इतके पैसे गुंतवा 

जर तुम्ही वयाच्या 21 व्या वर्षी या योजनेत 5.60 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर पूर्ण 10 लाख रुपये मिळतील. या पॉलिसीमध्ये, तुम्हाला मुदतपूर्तीच्या वेळी परतावा म्हणून पैसे मिळतात. 

या पॉलिसीमधून डबल फायदा कसा मिळवायचा?

या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्याने, गुंतवणूकदारांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचा लाभ मिळतो, यासोबतच 8.60 लाख रुपयांचा रिव्हिजनल बोनस देखील मिळतो. त्याचवेळी, तुमचा नफा दुप्पट करण्यासाठी, तुम्हाला त्यात 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतरच तुम्हाला दुप्पट बोनस मिळेल.